आज चंद्रपुरात १६ केंद्रांवर नागरिकांना कोरोनाची दुसरी मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:13+5:302021-05-13T04:29:13+5:30
तसेच १८ ते ४४ वर्ष वयोगटांतील नागरिकांसाठी ज्युबिली हायस्कूलच्या समोर एनयुएलएम ऑफिस, येथे कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे. कोरोना ...
तसेच १८ ते ४४ वर्ष वयोगटांतील नागरिकांसाठी ज्युबिली हायस्कूलच्या समोर एनयुएलएम ऑफिस, येथे कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ६० हजारांच्या आसपास लसीची पहिली व दुसरी मात्रा देण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मे पासून १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. गुरुवार, १३ मे २०२१ रोजी ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीची दुसरी मात्र देण्यासाठी १४ लसीकरण केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत. यात शहरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरा नगर, मूल रोड, पोद्दार स्कूल, अष्ठभुजा वॉर्ड, कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकारनगर, शकुंतला लॉन १, नागपूर रोड, गजानन मंदिर, वडगांव, नागपूर रोड, रवींद्रनाथ टागोर स्कूल, विठ्ठल मंदिर वार्ड, बजाज पाॅलिटेक्निक काॅलेज, बालाजी वार्ड, डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानापेठ वॉर्ड, सावित्रीबाई फुले स्कूल, नेताजी चौक बाबूपेठ, राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबूपेठ, मुरलीधर बागला शाळा, बाबूपेठ, खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली मंदिरजवळ, मातोश्री स्कूल, तुकुम, विद्या विहार, लॉ कॉलेज जवळ, तुकुम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर. एरिया हॉस्पिटल, लालपेठ (कोव्हॅक्सिन), डीइआयसी बिल्डिंग, जिल्हा सामान्य रुग्णालय (कोव्हॅक्सिन) यांचा समावेश आहे. दुसरा डोस घेण्यासाठी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील.