चंद्रपुरात आज ‘श्री संत गजानन गौरव गाथा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:48 PM2019-01-05T21:48:10+5:302019-01-05T21:48:28+5:30

विदभार्ची पंढरी शेगावीचा राणा गजानन म्हणजेच माऊली श्री संत गजानन महाराज यांच्या अध्यात्म, शिकवण व विचारांवर प्रकाश टाकणारी गौरव गाथा व संगीत संध्या कार्यक्रम रविवार दि. ६ रोजी पहिल्यांदाच चंद्रपुरात होत आहे. या कार्यक्रमासाठी चांदा क्लब ग्राऊंड गजानन भक्तांनी सज्ज केले आहे.

Today, 'Sri Sant Gajanan Gaurav Gatha' in Chandrapur | चंद्रपुरात आज ‘श्री संत गजानन गौरव गाथा’

चंद्रपुरात आज ‘श्री संत गजानन गौरव गाथा’

googlenewsNext
ठळक मुद्देतयारी पूर्ण : माऊलींच्या अध्यात्म, शिकवण व विचारांची मेजवाणी

चंद्रपूर : विदभार्ची पंढरी शेगावीचा राणा गजानन म्हणजेच माऊली श्री संत गजानन महाराज यांच्या अध्यात्म, शिकवण व विचारांवर प्रकाश टाकणारी गौरव गाथा व संगीत संध्या कार्यक्रम रविवार दि. ६ रोजी पहिल्यांदाच चंद्रपुरात होत आहे. या कार्यक्रमासाठी चांदा क्लब ग्राऊंड गजानन भक्तांनी सज्ज केले आहे.
या कार्यक्रमाला संत गजानन महाराज यांचे ज्यांच्या घरी वास्तव लाभले असे नागपूर येथील मुधोजी राजे भोसले यांची विशेष उपस्थिती लाभणार आहेत. संत गजानन महाराजांची गौरथ गाथा अकोला येथील गजानन महाराज यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक सुनील देशपांडे व औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज यांच्या जीवनावरील साहित्य लेखक श्रीधर वक्ते उपाख्य स्वामी दिव्यानंद सरस्वती सांगणार आहेत. गीत गजानन हा संगीतमय कार्यक्रम निरंजन बोबडे आणि संच सादर करणार आहेत. चंद्रपूरात पहिल्यांदाच व्यापक स्वरुपात होत असलेल्या या कार्यक्रमाला संत गजानन महाराज यांचा चंद्रपूरकर व जिल्ह्यातील भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून श्रींच्या पालखींच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी सायंकाळी ५ वाजतापर्यंत गजाननभक्त पोहचणार आहे. विशेष म्हणजे, आयोजन समिती या पालखीचे प्रवेशद्वारावर स्वागत करणार आहे. यामध्ये वडगाव येथील गजानन महाराज मंदिर, बाबूपेठ येथील महादेव मंदिर व सिस्टर कॉलोनी येथून निघणाऱ्या श्रींच्या पालखीचा समावेश असणार आहे.
श्री संत गजानन महाराज गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जंयत मामीडवार व सचिव पी. आर. देशमुख यांच्यासह किशोर बोधे, संजय जगशेट्टीवार, विवेक मामिडवार, अविनाश उत्तरवार, नितीन नक्षिणे, राजेंद्र तुम्मेवार, समीर तातावार, रंजना नागतोडे, शुभम डांगे, बंडू पोटे, सचिन चिंतावार, चैताली खटी, प्रिया चौधरी, सुनंदा चिंतावार, संदीप देशपांडे, किशोर गोगुलवार, अमोल सांबरे, छबुताई वैरागडे, मूलचे डॉ. कुळकर्णी, सतीश येनूरकर, अभय झाडे, भाऊराव ढोके, केशव मत्ते, मधुकर झाडे या मंडळींनी मागील १५ दिवसांपासून या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी डोम
ज्येष्ठ नागरिकांसाठी थंडीपासून संरक्षण म्हणून डोम व बसण्यासाठी खुचीर्ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू होणार, अशी माहिती श्री संत गजानन महाराज गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जंयत मामीडवार यांनी दिली.

Web Title: Today, 'Sri Sant Gajanan Gaurav Gatha' in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.