आज जिल्ह्यात चक्का जाम

By Admin | Published: January 11, 2017 12:45 AM2017-01-11T00:45:13+5:302017-01-11T00:45:13+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ११ जानेवारीला सकाळी ११ वाजता जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन आयोजित केले आहे.

Today, there is a roadblock in the district | आज जिल्ह्यात चक्का जाम

आज जिल्ह्यात चक्का जाम

googlenewsNext

स्वतंत्र विदर्भ राज्य : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आंदोलन
चंद्रपूर: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ११ जानेवारीला सकाळी ११ वाजता जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन आयोजित केले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या करण्यात येणार आहेत.
२८ सप्टेंबर २९५३ साली नागपूर करार करुन विदर्भाला जबरदस्तीने वैदर्भीय जनतेची मंजुरी न घेता महाराष्ट्रात सामिल करण्यात आले. तेव्हापासूनच वैदर्भीय जनतेवर अन्यायाची मालिका सुरु झाली असून ती सतत वाढतच आहे. करारानुसार, राज्यातील एकूण नोकऱ्यांपैकी २३ टक्के नोकऱ्या, शेतातील सिंचन आणि विजेचा अनुशेष, व्यापाऱ्यांवर विविध प्रकारचा अन्याय आदी अनेक बाबींसह अनेक प्रश्नावर सतत अन्याय झाला आहे. त्याचे परिमार्जन करण्यासाठी ‘स्वतंत्र विदर्भ’ हाच एकमेव पर्याय आहे. आता प्रखर आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याने विदर्भ राज्य आंदोलन समितीने ११ जानेवारीला संपूर्ण विदर्भात चक्का जाम- रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राजुरा येथे माजी आमदार वामनराव चटप, अ‍ॅड. देवाळकर, प्रा. अनिल ठाकूरवार, वरोरा तालुक्यात विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मो. बी. टेमुर्डे, अ‍ॅड. शरद कारेकर, रामभाऊ पारखी,सुभाष जिवतोडे, ब्रह्मपुरी येथे अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, डॉ. प्रेमलाल मेश्राम, चिमूर येथे माजी आमदार डॉ. रमेश गजभे, सुभाष खानोरकर, रघुनाथ सहारे, पडोली फाटा येथे किशोर पोतनवार, हिराचंद्र बोरकुटे, प्रा. एस, टी. चिकटे, अशोक मुसळे, मितीन भागवत, अ‍ॅड, चैताली बोरकुटे, किरण बुटले, मूल येथे कवडू येनप्रेडीवार, विवेक मांदाडे, पोंभुर्णा येथे किशोर गुजनवार, गिरीधर बैस, कोरपना येथे अरुण नवले, प्रभाकर दिवे, निळकंठ कोरांगे, रवी गोखरे, गोंडपिपरी येथे अरुण वासलवार, तुकेश वानोडे, राजेश कवठे, व्यंकटेश मल्लेलवार, दीपक फालके, भद्रावती येथे राजू बोरकर, सुधीर सातपुते, मुनाब शेख, नागभीड येथे मंगेश सोनकुसरे, मंगेश शेंडे आदी सह अनेक नेते व कार्यकर्ते करणार आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे,, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमी भाव देण्यात यावा व संपूर्ण कर्जमुक्ती करावी, विजेचे लोडशेडींग संपवावे, चार लाख वैदर्भीय बेरोजगारांचा बॅकलॉग तातडीने भरावा, महिला बचत गटावरील मायर्को फायनान्सचे कर्ज माफ करावे, नवीन वीज पंपाना वीज पुरवठा करावा, विरुर (गाडेगाव) येथील वेकोली ने भुअर्जन केल्यानंतर राहिलेली १७ टक्के जमीन तात्काळ भूअर्जीत करावी, २००६ च्या वनहक्क कायद्यानमधून इतर पारंपारीक वननिवासी या व्याख्येतील तीन पिढ्यांची अट रद्द करावी, जिल्ह्यातील सर्व कोळसा खानीकरिता घेतलेल्या जमीन धारकाच्या अवलंबित व्यक्तीच्या मुलींनाही नौकरी द्यावी, शेतकऱ्यांचे उभे पिक वेकोलीच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली खचल्याने झालेल्या नुकसानीची कृषी खात्याच्या पंचनाम्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी इत्यादी सह अनेक मागण्या या आंदोलकांनी शासनापुढे मांडल्या आहेत. (प्रतिनिधी)

११ तारखेला ११ ठिकाणी आंदोलन
अखंड महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, ही घोषणा देत विदर्भवादी चंद्रपूर जिल्ह्यात ११ ठिकाणी ११ जानेवारीला सकाळी ११ ते ५ या वेळात रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. चंद्रपूर जवळील पडोली फाटा, वरोरा तालुक्यातील टेमुर्डा फाटा, ब्रह्मपुरी, मूल, पोंभुर्णा, नागभीड, चिमूर, भद्रावती, कोरपना, राजुरा, गोंडपिपरी आदी ११ ठिकाणी विदर्भवादी कार्यकर्ते, नागरिक, महिला व शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

Web Title: Today, there is a roadblock in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.