आजचे तरुण हे भारताच्या भविष्याचे भाग्यविधाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:32+5:302021-01-21T04:26:32+5:30
कोरोनाकाळात अमेरिकेसारख्या देशाने भारताकडून औषधी आयात केल्या. भारताकडे आज कोरोनाच्या लसीसाठी जगभरातून मागणी केली जात आहे. आज खऱ्या अर्थाने ...
कोरोनाकाळात अमेरिकेसारख्या देशाने भारताकडून औषधी आयात केल्या. भारताकडे आज कोरोनाच्या लसीसाठी जगभरातून मागणी केली जात आहे. आज खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. या देशामध्ये मोठी शक्ती आहे. त्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याची आवश्यकता आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या लोकसेवा मंडळाचे आद्य संस्थापक स्व. नीळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांच्या ११३ व्या जयंती समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. प्रमुख वक्ते म्हणून विहिंपचे विदर्भ प्रांत महामंत्री गोविंद शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेश शितोळे, लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार, लोकसेवा मंडळाचे सचिव मनोहरराव पारधे, सहसचिव नामदेवराव कोल्हे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य मधुकरराव नारळे, उमाकांत गुंडावार, प्राचार्य पी.आर.बतकी, पर्यवेक्षक बी. एम. दरेकर, जयंती समारोह प्रभारी प्रा. सचिन सरपटवार प्रभृती मंचावर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते गोविंद शेंडे यांचा शाल, श्रीफळ, वृक्ष आणि ग्रामगीता भेट देऊन चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिद्धी मिलिंद गंपावार या विद्यार्थिनीने डी.फार्म.मध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्दल तिच्या वडिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य बतकी यांनी केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य सुरेश परसावार यांनी केले. पर्यवेक्षक दरेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.