तोहोगाव मार्ग ठरतो आहे जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:45+5:302021-09-24T04:32:45+5:30
कोठारी : गोंडपिपरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोठारी, तोहोगाव मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जीवघेणा ठरत आहे. मार्गावरील खड्ड्यांमुळे ...
कोठारी : गोंडपिपरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोठारी, तोहोगाव मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जीवघेणा ठरत आहे. मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले असून बांधकाम विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत का, असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.
कोठारी, तोहोगाव, लाठी मार्ग हा नेहमीच नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेला आहे. सततच्या पावसामुळे मार्ग उखडत चालला आहे. यामुळे पावसाचे पाणी साचून मोठमोठे खड्डे पडले आहेत. बामणी, कुडेसावली दरम्यान पुलानजीक मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने कित्येक अपघात झाले आहेत. अपघातात जीवहानी झाली आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. त्याचसोबत परसोडी, पाचगाव दरम्यान नव्याने बांधकाम होत असलेला पूल या भागातील प्रवासी नागरिकांसाठी डोकेदुखीच ठरत असून कंत्राटदारांच्या व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या नियोजनशून्यतेमुळे दैनंदिन वाहने फसण्याचा प्रकार घडत आहे. अशा दयनीय मार्गामुळे व वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याने परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या बंद पडल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शेतकरी व शासकीय कार्यालयीन कामांना विलंब होऊन अनेकांचे नुकसान होत आहे.
230921\1539-img-20210923-wa0036.jpg
pramod yerawar