स्वच्छतागृहाची दुरवस्था, जि.प. शाळेतील विद्यार्थी उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:53 AM2021-02-28T04:53:46+5:302021-02-28T04:53:46+5:30
शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाने सर्व शिक्षा अभियान, जिल्हा निधी व ...
शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाने सर्व शिक्षा अभियान, जिल्हा निधी व डीपीसीच्या निधीतून प्रत्येक शाळेत मुले व मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधली. जिल्ह्यातील १५६० शाळांमध्ये सुमारे १० हजार २०६ स्वच्छतागृह बांधण्यात आले. मात्र अल्पावधीत काही स्वच्छतागृहात पाणी समस्या, नळ दुरवस्था, पाईपलाईन चोकअप आधी समस्या उद्भवल्या. तर अनेक ग्रामीण मुले शौचास गेल्यानंतर पाणीसुद्धा टाकत नाही. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होते. त्यातच कोरोनामुळे सुमारे ११ महिन्यापासून शाळा बंद होती. त्यामुळे वापर बंद होता. त्यामुळे दहा हजार २०६ शौचालयापैकी ३६१ शौचालयाची दुरवस्था झाली आहे, तर नऊ हजार ४५ शौचालय चांगल्या स्थितीत आहेत.
बॉक्स
या आहेत अडचणी
ग्रामीण भागात पाण्याची समस्या आहे. तसेच दुरवस्था झाली तर निधीअभावी वेळीच सुधारणा होत नाही. ग्रामीण भागातील अनेक मुले शौचास गेल्यानंतर पाणीच टाकत नाही. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असते.
तालुका दुरवस्था झालेली स्वच्छतागृहे
बल्लारपूर ५
भद्रावती ८
ब्रह्मपुरी २०
चंद्रपूर १९
चिमूर १५
गोंडपिपरी २२
जिवती ५८
कोरपना ३३
मूल ३३
नागभीड २५
पोंभुर्णा १४
राजुरा १४
सावली ४४
सिंदेवाही २१
वरोरा ३०