चंद्रपूर जिल्ह्यात टोमॅटोचे भाव आकाशाला भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 02:26 PM2020-07-17T14:26:34+5:302020-07-17T14:26:55+5:30
चंद्रपूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण लॉकडाऊन पुकारले आहे. त्यामुळे चंद्रपूर वरुन येणारा भाजीपाला आज मार्केट मध्ये न आल्याने टोमॅटोचे भाव वाढले आहेत.
Next
ठळक मुद्दे८० ते १०० रु. किलो
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टोमॅटोचा भाव ८० ते १०० रु. किलो होता. मागील आठवड्यात ५० रु.किलो होता. तसेच भाज्यांचे भाव ही वाढल्याने नागरिकांचे कंबरडे मोडलेले आहे. चंद्रपूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण लॉकडाऊन पुकारले आहे. त्यामुळे चंद्रपूर वरुन येणारा भाजीपाला आज मार्केट मध्ये न आल्याने टोमॅटोचे भाव वाढले आहेत. आजूबाजूच्या खेड्यावरील कास्तकारांकडील भाजीपाला बाजारात आलेला होता त्यामुळे भाज्यांचेही भाव वधारले होते. हे लॉकडाऊन ३१ तारखेपर्यंत वाढले तर टमाटर चे भाव १२० ते १५० रु .पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.