महाविद्यालयातही गुंजतो आता प्रार्थनेचा स्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:24+5:30
प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रार्थना घेणे फार पूर्वीपासून सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे त्याचबरोबर त्यांचे अध्यापनात मन लागावे हा या प्रार्थनेमागे उद्देश असावा. मात्र जशी शाळांमध्ये प्रार्थना घेण्यात येते, तशी प्रार्थना महाविद्यालयात होेत नव्हती. महाविद्यालयात प्रार्थनेचे बंधन नसल्यामुळे कोणतेही महाविद्यालय प्रार्थना घेत नव्हते.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : प्रार्थना मनशांंतीचे उत्तम माध्यम आहे. तसेच ते शिस्त लावण्याचे साधनही आहे. म्हणूनच शाळा, शासकीय कार्यालय व सार्वजनिक प्रतिष्ठाणांमध्ये प्रार्थना घेण्याची प्रथा रूढ झाली असावी. पण आता प्रार्थनेचा हाच स्वर महाविद्यालयातही गुंजायला लागला आहे.
प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रार्थना घेणे फार पूर्वीपासून सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे त्याचबरोबर त्यांचे अध्यापनात मन लागावे हा या प्रार्थनेमागे उद्देश असावा. मात्र जशी शाळांमध्ये प्रार्थना घेण्यात येते, तशी प्रार्थना महाविद्यालयात होेत नव्हती. महाविद्यालयात प्रार्थनेचे बंधन नसल्यामुळे कोणतेही महाविद्यालय प्रार्थना घेत नव्हते. महाविद्यालयात प्रार्थना होत नसल्यामुळे विद्यार्थीही आपापल्या सोयीने महाविद्यालयात यायचे. मात्र मागील सत्रापासून शासनाने एक आदेश काढून महाविद्यालयांनाही प्रार्थना सक्तीची केली आहे. यासाठी शासनाने आपल्या स्तरावरून विद्यापिठांना प्रत्येक महाविद्यालयात प्रार्थना झाली पाहिजेत, असे निर्देश दिले. शासनाचे हे निर्देश मिळताच विद्यांपिठांनी महाविद्यालयांना सूचित करून नियमित प्रार्थना घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांना विद्यापिठाचे जेव्हापासून प्रार्थना घेण्याचे निर्देश देण्यात आले, तेव्हापासून महाविद्यालयातही प्रार्थनेचे स्वर गुंजू लागले आहेत. या प्रार्थनेत विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्गही सहभागी होतात.
शासनाने विद्यापीठास आणि विद्यापीठाने महाविद्यालयांना हा उपक्रम आवश्यक केला आहे. उपक्रम अतिशय सुंदर आहे. आमच्या महाविद्यालयात या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे.
- डॉ. संजय सिंग
प्राचार्य, गो.वा.महाविद्यालय नागभीड