रोजगाराच्या नव्या संधी देणार पोंभुर्णातील टुथपिक केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:04 PM2018-12-19T23:04:10+5:302018-12-19T23:04:32+5:30
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅण्ड आर्ट युनिट उभारण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅण्ड आर्ट युनिट उभारण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या वतीने सदर टूथपिक उत्पादन केंद्रासाठी टाटा ट्रस्टने सामाजिक दायित्वाअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला बआहे. पोंभुर्णा येथे बांबू हॅन्डीक्रॉफ्ट अॅण्ड आर्ट युनिटच्या माध्यमातून परिसरातील युवक व महिलांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे टूथपिक उत्पादन केंद्राच्या माध्यमातून या भागात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. चिचपल्ली येथील केंद्रातूनही बांबूवर आधारित आधुनिक प्रशिक्षणाचे दालन सुरू झाले. अर्थ व वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते टूथपिक उत्पादन केंद्र व बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅण्ड आर्ट युनिटचे लोकार्पण होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, माजी नगर पंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, नगर पंचायत अध्यक्ष श्वेता बनकर उपस्थित राहणार आहेत.
वायफाय सुविधा
पोंभुर्णा येथील बसस्थानकाच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पणही होणार आहे. प्रवाशांना सर्व मूलभूत सोईसुविधा देण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.