‘नथिंग टु से’ राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:01 PM2019-02-16T22:01:13+5:302019-02-16T22:01:30+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ६६ व्या कामगार राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत कामगार कल्याण केंद्र ललित कला भवन चंद्रपूर अर्थात नवोदिता चंद्रपूरच्या चमुने सादर केलेल्या प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टु से’ या नाटकाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट नाटय निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह सहा पारितोषिके या नाटकाने पटकाविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ६६ व्या कामगार राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत कामगार कल्याण केंद्र ललित कला भवन चंद्रपूर अर्थात नवोदिता चंद्रपूरच्या चमुने सादर केलेल्या प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टु से’ या नाटकाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट नाटय निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह सहा पारितोषिके या नाटकाने पटकाविली आहे.
सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती प्रथम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम डॉ. जयश्री कापसे-गावंडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम बकूळ धवने, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम हेमंत गुहे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम पंकज नवघरे, तेजराज चिकटवार, अंकुश राजुरकर, पुरूष अभिनय उत्तेजनार्थ राजेंद्र तुपे अशी सहा पारितोषिके या नाटकाला मिळाली असून सदर नाटक राज्यात अव्वल ठरले आहे. या नाटकाची निर्मिती अजय धवने, कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे, प्रशांत कक्कड यांची असून निर्मिती सहाय्य आशिष अंबाडे यांचे आहे. पार्श्वसंगीत प्रताप सोनाळे यांचे असून रंगभुषा आणि वेशभुषेची जवाबदारी नूतन धवने यांनी सांभाळली आहे. नाटकात जयंत वंजारी, राजेंद्र तुपे आणि बकूळ धवने यांनी प्रमुख भुमिका केल्या आहे. सदर नाटक सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित राज्य नाटय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतही प्रथम आले असून अंतिम फेरीत दाखल झाले आहे. सांगली येथे २२ फेब्रुवारी रोजी सदर नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.