ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:28 PM2020-09-14T21:28:13+5:302020-09-14T21:29:14+5:30

राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने पर्यटकांसाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोअर क्षेत्रातही पर्यटन सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंद करण्याचे आवाहन ताडोबा- अंधारी प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले.

Tourism in the core area of Tadoba Tiger Reserve starts from October 1 | ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील पर्यटनाला १ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत केवळ बफर झोन क्षेत्रातच पर्यटनाला परवानगी होती. मात्र, राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने पर्यटकांसाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोअर क्षेत्रातही पर्यटन सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंद करण्याचे आवाहन ताडोबा- अंधारी प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले. कोअर क्षेत्रातील पर्यटनासाठी खुल्या जीपमध्ये वाहन चालक, मार्गदर्शक व चार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. १० वर्षांखालील व ६५ वर्षांवरी व्यक्ती व गर्भवती महिलांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. यापूर्वी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागत होती. मात्र, आता ताडोबा प्रकल्पाने स्वत:चे संकेतस्थळ तयार केले असून त्यावरही १६ सप्टेंबरपासून बफर व कोअर झोन पर्यटनाची नोंदणी करता येणार आहे.

Web Title: Tourism in the core area of Tadoba Tiger Reserve starts from October 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.