अंमलनाला पर्यटन स्थळ जिल्ह्याचे केंद्रबिंदू ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:55+5:302021-07-03T04:18:55+5:30

विजय वडेट्टीवार : अंमलनाला प्रकल्पाचे सौंदर्यीकरण कोरपना : आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने अंमलनाला पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी नऊ ...

The tourist destination will be the focal point of the district | अंमलनाला पर्यटन स्थळ जिल्ह्याचे केंद्रबिंदू ठरणार

अंमलनाला पर्यटन स्थळ जिल्ह्याचे केंद्रबिंदू ठरणार

Next

विजय वडेट्टीवार : अंमलनाला प्रकल्पाचे सौंदर्यीकरण

कोरपना : आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने अंमलनाला पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. निसर्गरम्य पहाडी भागातील अंमलनाला सिंचन प्रकल्प पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार असून, हे पर्यटन स्थळ जिल्ह्याचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

अंमलनाला प्रकल्पाचे सौंदर्यीकरण, करमणूक केंद्र व पर्यटन विकास कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर, राजुराचे तहसीलदार हरीश गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना.वडेट्टीवार यांनी अंमलनाला पर्यटन विकासाच्या कामासाठी आवश्यकता भासल्यास, आणखी तेवढाच निधी प्राप्त करून देणार असल्याचे यावेळी म्हटले. आमदार सुभाष धोटे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, एखादे काम मनात ठरविले की, निधी मंजुरीसाठी कसोशीने प्रयत्न केला जातो. माणिकगड किल्ल्याच्या सौंदर्यीकरण व संवर्धनासाठीही आपण दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, असे धोटे म्हणाले.

संचालन आशिष देरकर यांनी केले. प्रास्ताविक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. काळे यांनी केले, तर आभार शाखा अधिकारी अमीर सय्यद यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता उपविभागीय अभियंता डी.एन. मदनकर, कंत्राटदार प्रतिनिधी रामन्ना रेड्डी, आर्किटेक शहरिष शेख, विक्रम येरणे, संतोष महाडोळे, शैलेश लोखंडे, प्रीतम सातपुते, आशिष वांढरे आदींनी सहकार्य केले.

Web Title: The tourist destination will be the focal point of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.