आसोला मेंढा तलावावर पर्यटकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 12:46 AM2016-07-29T00:46:22+5:302016-07-29T00:46:22+5:30

ब्रिटीशकालीन आसोला मेंढा तलावाच्या पूर्णत्वाने शतकपूर्तीचा उंबरठा गाठला आहे. येत्या २०१७ मध्ये या तलावाचा शतकपूर्ती महोत्सव साजरा होण्याची शक्यता आहे.

Tourists on the hill of Asola Ramb | आसोला मेंढा तलावावर पर्यटकांची मांदियाळी

आसोला मेंढा तलावावर पर्यटकांची मांदियाळी

Next

देशी-विदेशी पक्षाचे येथे स्थलांतर :  वनौषधी, वनसंपत्तीने समृद्ध परिसर
उदय गडकरी  सावली
ब्रिटीशकालीन आसोला मेंढा तलावाच्या पूर्णत्वाने शतकपूर्तीचा उंबरठा गाठला आहे. येत्या २०१७ मध्ये या तलावाचा शतकपूर्ती महोत्सव साजरा होण्याची शक्यता आहे. १०० वर्षाचा हा तलाव निसर्ग पर्यटकांसाठी मांदियाळीच ठरणारा आहे. कोणत्याच प्रकारची शासकीय मदत व सुविधा नसताना सुद्धा निसर्ग पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी हे त्याचेच ध्योतक आहे.
ब्रिटिशांनी केवळ सिंचनाची सोय म्हणून आसोला मेंढा तलावाची निर्मिती केली. मात्र कालपरत्वे मााणसाच्या आवडी-निवडी बदलायला लागल्या आणि दैनंदिन धकाधकीच्या गराड्यातून मन:शांती लाभावी, आराम मिळावा, समाधान लाभावे, जीवनाचा आनंद घ्यावा, याकरिता लोकांनी एक दिवस का होईना, निसर्गाच्या सानिध्यात घालवावा अशी परिस्थिती निर्माण झाली. वनवैभवाने नटलेला निसर्गरम्य परिसर सर्वांच्याच आवडीचा विषय ठरला. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. जागतिक दर्जाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प, घोडाझरी तलाव या शिवाय जिल्ह्यातील अनेक ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. काही तलावांना शासनाने पर्यटनाचा दर्जा दिला आहे. परंतु, आसोलामेंढा सारख्या तलावाची शासन दरबारी कायम उपेक्षाच राहिली आहे.
प्रत्येक पर्यटन स्थळाचे वेगवेगळे महत्त्व असल्याने निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने आसोला मेंढा तलाव अत्यंत उपयुक्त ठिकाण ठरला आहे. तलाव पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरुन खळखळ वाहणारे पाण्याचे दृष्य मनाला मोहून टाकणारे असते. धबधब्यासारखे वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरात अल्हाददाय वातावरणाची निर्मिती होत असते. वनवैभव, डोंगरकपारी आणि तलावाचे समुद्रासारखे दिसणारे सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी निसर्ग पर्यटकांची पाऊले आपोआपच आसोला मेंढा तलावाच्या दिशेने चालायला लागली आहेत. सावली तालुका मुख्यालयापासून हा तलाव २० कि.मी. अंतरावर तर सिंदेवाही तालुका मुख्यालयापासून २४ कि.मी. अंतरावर आहे. दोन्ही मार्गाने या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता येऊ शकते.

Web Title: Tourists on the hill of Asola Ramb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.