उमा नदीत ट्रॅक्टर कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:36 AM2019-08-30T00:36:21+5:302019-08-30T00:36:50+5:30
शोध पथकाच्या अविरत प्रयत्नानंतर सदर ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह गुरुवारला नदीतून बाहेर काढण्यास यश मिळाले. रत्नाकर शिंदे (३६) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो राजगड येथील रहिवासी आहे. पोळ्याच्या तोंडावर ही घटना घडल्याने राजगडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शेतात चिखलणी करुन नादुरुस्त झालेले ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी मूल येथे नेत असताना बोरचांदली मार्गावरील उमा नदीत कोसळला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.
शोध पथकाच्या अविरत प्रयत्नानंतर सदर ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह गुरुवारला नदीतून बाहेर काढण्यास यश मिळाले. रत्नाकर शिंदे (३६) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो राजगड येथील रहिवासी आहे. पोळ्याच्या तोंडावर ही घटना घडल्याने राजगडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटना माहित होताच पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली होती. रात्र झाल्याने बुडालेल्या चालकाचा शोध घेता आला नाही. नदीत पाणी भरपूर असल्याने चालकाचा शोध लागला नव्हता.
मात्र गुरुवारला पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाच्या वतीने रेस्कू टीमद्वारा शोध मोहीम राबविण्यात आली. बोटीद्वारे बेपत्ता चालकाचा शोध घेण्यात आला. क्रेनद्वारा पाण्यातून ट्रॅक्टर काढण्यात आला. ट्रॅक्टरच्या इंजिनमध्येच रत्नाकर शिंदे यांचा मृतदेह सापडला.