वाघ शोधण्यासाठी वनाधिकाऱ्यांचा ट्रॅक्टरने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:09 PM2018-09-26T23:09:34+5:302018-09-26T23:09:53+5:30

येथील वर्धा नदीच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी तसेच वाघाच्या शोधासाठी भद्रावती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र घटनेच्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना अंदाजे दीड किलोमीटर चक्क ट्रॅक्टरने प्रवास करावा लागला.

Tractor journey by the forest officials to find tigers | वाघ शोधण्यासाठी वनाधिकाऱ्यांचा ट्रॅक्टरने प्रवास

वाघ शोधण्यासाठी वनाधिकाऱ्यांचा ट्रॅक्टरने प्रवास

Next
ठळक मुद्देरस्ते चिखलमय : वाघाने केल्या तीन शेळ्या ठार

रत्नाकर ठोंबरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पिपरी देशमुख : येथील वर्धा नदीच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी तसेच वाघाच्या शोधासाठी भद्रावती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र घटनेच्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना अंदाजे दीड किलोमीटर चक्क ट्रॅक्टरने प्रवास करावा लागला.
पिपरी देशमुख येथे वर्धा नदीच्या काठावर नेहमीप्रमाणे शेळ्या चरत असताना कळपावर वाघाने हल्ला चढविला. यात शेळ्या चारत असलेला इसम सुदैवाने बचावला. मात्र वाघाच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. काही क्षणातच घटनेची वार्ता वाºयासारखी पसरली. पिपरी देशमुख येथील पोलीस पाटील सुनिता ठोंबरे यांनी वनविभागाला भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर व वनविभागाची चमू घटनेचा पंचनामा करण्यासाठी तसेच वाघाच्या शोधासाठी घटनास्थळी दाखल झाले
नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे घटनास्थळापर्यंत जाणारा पांदण रस्ताही चिखलाने माखला होता. घटनास्थळ हे नदीकाठी असल्यामुळे तिथे जाण्यासाठी ट्रॅक्टरशिवाय पर्याय नव्हता. गावातील संदीप नांदे यांनी यावेळी आपले ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. वाघाच्या शोधासाठी वनपरिक्षेत्राधिकारी व चमूला झाडाझुडूपातून रस्ता काढून दीड किलोमीटरचा खडतर प्रवास ट्रॅक्टरने करावा लागला. यावेळी गावातील पंढरी खुटेमाटे, तंमुस अध्यक्ष भाऊराव खुटेमाटे व गावातील काही नागरिकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर घटनास्थळापर्यंतचा प्रवास केला. दरम्यान, ट्रॅक्टरचा प्रवास हा आपल्या आयुष्यातील पहिलाच प्रवास असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर यांनी सांगितले.

Web Title: Tractor journey by the forest officials to find tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.