सरकारविरुद्ध व्यापारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:47 PM2018-09-28T22:47:37+5:302018-09-28T22:48:37+5:30

केंद्र सरकारने व्यावसायिक गुंतवणुकीसाठी प्रस्तावित एफ डीआय (फ ॉरेन फं डिग इन्व्हेस्टमेंट) धोरणाचा मसुदा तयार केला. त्यामुळे विक्रेते व रूग्णांच्या हक्कांवर बाधा येऊ शकते, असा आरोप करून जिल्ह्यातील व्यापारी व औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता. बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ब्रह्मपुरीत निदर्शने करण्यात आली तर तालुका केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशने संबंधित तहसीलदारांना निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेधले.

Trade unions against the government | सरकारविरुद्ध व्यापारी एकवटले

सरकारविरुद्ध व्यापारी एकवटले

Next
ठळक मुद्देएफडीआय धोरणाच्या निषेधार्थ बंद : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, ब्रह्मपुरीत निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारने व्यावसायिक गुंतवणुकीसाठी प्रस्तावित एफ डीआय (फ ॉरेन फं डिग इन्व्हेस्टमेंट) धोरणाचा मसुदा तयार केला. त्यामुळे विक्रेते व रूग्णांच्या हक्कांवर बाधा येऊ शकते, असा आरोप करून जिल्ह्यातील व्यापारी व औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता. बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ब्रह्मपुरीत निदर्शने करण्यात आली तर तालुका केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशने संबंधित तहसीलदारांना निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेधले.
चंद्रपुरात आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिशन व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी सकाळी दहा वाजता शहरातील बाजारपेठात फिरून बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे बहुतांश दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग घेतला. केमीस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेने आपापली औषध दुकाने बंद ठेवले. शहरातील गोल बाजारातील सर्वच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. सकाळपासूनच काही दुकाने बंद होती. परिणामी, किराणा व अन्य वस्तु खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गोची झाली. दरम्यान, शहरातील औषधी दुकाने पूर्णत: बंद होती. मात्र अन्य व्यापाऱ्यांनी मोर्चा आल्यानंतर आपली दुकाने तात्पूरती बंद केली होती. जटपुरा गेटजवळ दुचाकीवरून आलेल्या मेडिकल चालकांनी भर रस्त्यावर दुचाकी उभी करून रस्ता अडवून धरला. अशातच एका विद्यार्थिनीशी हुज्जत घातली. विद्यार्थीनीने चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, धनराज भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. औषध खरेदी करण्यासाठी आॅनलाईन पध्दती लागू करू नये, सरकारने प्रस्तावित एफडीआय कायदा तयार करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. बंदला चंद्रपुरातील चेंबर आॅफ कॉमर्स या संघटनेनेही पाठिंबा दर्शविला होता.
राजुरा येथील औषध विके्रत्यांच्या बंदला राजुरा तालुका काँग्रेसने पाठिंबा दिला होता. माजी आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री व औषध प्रशासन विभाग मंत्रालयाला पत्र पाठवून समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष हितेश डाखरे, सचिव धनंजय बोबडे, नवरत्न गोटी, ओमप्रकाश चाडक, कमलक्रिष्ण बजाज, रावसाहेब आवारी, मंगेश उपगंलावार, संदिप जैन, कैलास रेगुलवार, गोपाल सारडा, राहू आवारी आदी उपस्थित होते. ब्रम्हपुरी तालुक्यात एफडीआय धोरणाविरूद्ध शहरातील मेडिकल स्टोअर्स आज बंद ठेवण्यात आले होते.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदा, वनसडी, पारडी, कवठाळा येथील औषध विक्रेत्यांनी दिवसभर मेडिकल बंद ठेऊन सरकारच्या प्रस्तावित कायद्याचा विरोध केला. केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तहसीलदार व ठाणेदाराला निवेदन देण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष पराग जकाते, सचिव विनोद चटप, दिलीप जेनेकर, सुरेश माहुरे, सुरेश कपले, अजय मुनगीलवार, सतीश डाहुले, सुरेंद्र ठवसे, दिवाकर कवरासे, नीलेश ताजने, नितीन डोर्लीकर, दिवाकर वडस्कर, ईश्वर खनके, राहुल राजुरकर उपस्थित होते.
सिंदेवाही तालुका अध्यक्ष प्रवीण जयस्वाल, सचिव प्रशांत देवलीकर, विनोद निनावे, संजय बोडणे, दुष्यंत बन्सोड, दशरथ बोकडे, राजेश कावले, चेतन बोरकर, पिलेवान, राजू पशिने, मिलिंद तगलपल्लीवार सहभागी झाले होते.
वरोºयातील किराणा व कापड दुकाने दिवसभर सुरू होती. परंतु ४५ औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती. खासगी डॉक्टरांकडे उपचार करणाऱ्या रूग्णांना औषधाविना दिवस काढावे लागले. व्यापारी संघटनेने तहसीलदाराला निवेदन देण्यात आले.
मूल येथील औषध दुकानेही दिवसभर बंद होती. अध्यक्ष किशोर गोगुलवार, जयंत दांडेकर, संजय चिंतावार, उमेश चेपूरवार, मनिष येलट्टीवार, सोनू वाळके यांनी बंदसाठी पुढाकार घेतला होता.
औषधअभावी रूग्णांचे हाल
शहरातील औषध विक्रेत्यांनी दिवसभर कडकडीत बंद पाळला. त्यामुळे औषध खरेदीसाठी रूग्णांच्या नातेवार्इंना भटंकती करावी लागली. जिल्हा सामान्य रूग्णालय समोरील सर्वच औषध दुकाने बंद ठेवल्याचे दिसून आले. गोल बाजारातील कापड व किराणा दुकाने बंद ठेवण्यात आल्याने दिवसभर शुकशुकाट होता. नागभिड, सिंदेवाही, राजुरा, भद्रावती, वरोरा, चिमूर, गोंडपिपरी, सावली, ब्रह्मपुरी, कोरपना, मूल येथेही औषध विके्रत्यांनी दिवसभर दुकाने बंद करून सरकारचा निषेध केला.

Web Title: Trade unions against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.