दिवा विझविण्याची नाही, तर लावण्याची परंपरा - विजय दर्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 05:03 AM2019-10-04T05:03:33+5:302019-10-04T05:04:19+5:30
महात्मा गांधींनी अहिंसेचा संदेश दिला, हीच परंपरा पुढेही कायम ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.
चंद्रपूर : महात्मा गांधींनी अहिंसेचा संदेश दिला, हीच परंपरा पुढेही कायम ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपली परंपरा दिवा विझविण्याची नाही तर लावण्याची आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
‘जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी’च्या वतीने ‘जवाहरलाल दर्डा मेमोरियल आर्ट कॅम्प’ या आगळ्यावेगळ्या शिबिराचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गरम्य वातावरणात इरई सफारी रिट्रीट ताडोबा (चंद्रपूर) येथे देश-विदेशातील २० ख्यातनाम रंगकर्मींचा पाच दिवस कलाविष्कार सुरूआहे. प्रसिद्ध चित्रकार दीपक शिंदे यांचा बुधवारी वाढदिवस होता. यासोबतच आॅक्टोबरमध्ये जन्मलेल्या कलावंतांचा वाढदिवस सामूहिकरीत्या विविध रंग व विविध छटांनी तयार केलेला आगळावेगळा केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी विजय दर्डा बोलत होते.
याप्रसंगी आर्किटेक्ट जयश्री भल्ला, ‘श्लोक’च्या संचालक शीतल दर्डा, कोठारी ग्रुपचे संचालक सुनित कोठारी, इंट्रिया ज्वेलर्सच्या
पूर्वा कोठारी, आर्ट कन्सलटंट तृप्ती जैन तसेच इरई रिसोर्टच्या उमा धनवटे, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा व सरला बोथरा यांच्यासह शिबिरासाठी आलेल्या सर्व कलावंतांची उपस्थिती होती.