धान रोवणी काळातील पारंपारिक गाणी लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:58 AM2019-08-25T00:58:24+5:302019-08-25T00:58:51+5:30

सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास शेतकरी शेतात राबतो. एकदाची रोवणी केव्हा आटोपते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. रोवणीची कामे आटोपली की, शेतापासून घरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढून आनंद साजरा केला जातो. परंतू ही परंपवा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

The traditional songs of paddy transplantation disappear | धान रोवणी काळातील पारंपारिक गाणी लुप्त

धान रोवणी काळातील पारंपारिक गाणी लुप्त

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । गुते पद्धतीही कालबाह्य, आधुनिक यंत्राच्या वापराकडे कल, गाण्यातून व्यक्त होत होत्या महिला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतल्या जाते. ग्रामीण भागात धानाची रोवणी करताना गाणी म्हणायची परंपरा होती. परंतू आता लुप्त होण्याच्या मार्गावर आली आहे. वाजागाजासह शेतातून घरापर्यंत मिरवणूक काढण्याची प्रथा आता कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील लोकाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही आदी परिसरात भात पिकांची तर कोरपना, वरोरा, राजुरा तालुक्यात कापासाचे उत्पन्न घेतले जाते. नव्या हंगमाला सुरुवात करताना शेतकरी हंगामातील कामाला सुरुवात करुन पारंपारिक पूजा विधी करतात. त्यानंतर जून महिन्यात शेतकरी मशागतीची कामे करतात. जुनच्या मध्यात पेरणी केली जाते. त्यानंतर पावसाला अनुरूप रोवणीची कामे हाती घेतली जातात. सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास शेतकरी शेतात राबतो. एकदाची रोवणी केव्हा आटोपते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. रोवणीची कामे आटोपली की, शेतापासून घरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढून आनंद साजरा केला जातो. परंतू ही परंपवा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
रोवणी करताना महिला पूर्वी गाणे गायच्या. यावेळी त्या गाण्यातूनच आपल्या भावना व्यक्त करायच्या. तर रोवणीसाठी अनेक गावावरुन मुजरांचा गुताच यायचा. मात्र आता ते गुतासुद्धा येणे बंद झाले आहे.

रोवणी समाप्तीचा आनंदही ओसरला
रोवणी संपल्यानंतर शेतातील मजूर मोठ्या प्रमाणात चिखल खेळायचे. त्यानंतर चिखल प्रत्येक मजुराच्या अंगाला लावून वाजतगाजत शेतमालकाच्या घराकडे यायचे. शेतातून आणलेले चिखल शेतमालकाला लावून त्यांच्याकडून भोजारा (बक्षीस) घ्यायचे. परंतु सद्यास्थितीत ही पद्धत जिल्ह्यातून कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.

श्रमाच्या भाकरीचा आनंद
खरीप हंगामातील तीन ते चार महिने श्रम केल्यानंतर वर्षभर उदरनिर्वाहापुरते धान्य प्राप्त करण्यासाठी शेतकरी धडपड करतो. एकदा रोवणीची कामे आटोपली की पूजा करून तसेच मजुरांना भोजनाची मेजवानी देवून आनंद व्यक्त करतो. परंतु ही अनोखी परंपराही जिल्ह्यातील काही गावातच शिल्लक आहे.

Web Title: The traditional songs of paddy transplantation disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.