नवीन एचआरडीमध्ये सामावून घेण्यासाठी कामगारांना वाहतूक बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:26 AM2021-02-12T04:26:19+5:302021-02-12T04:26:19+5:30
घुग्घुस: वेकोलि वणी क्षेत्रातील कोलगाव कोळसा खाणीत कार्यरत सदभाव इंजिनिअरिंग कंपनीच्या कामगारांना नवीन एचआरडी ट्रान्स्पोटिंग कंपनीमध्ये सामावून घेण्यात यावे, ...
घुग्घुस: वेकोलि वणी क्षेत्रातील कोलगाव कोळसा खाणीत कार्यरत सदभाव इंजिनिअरिंग कंपनीच्या कामगारांना नवीन एचआरडी ट्रान्स्पोटिंग कंपनीमध्ये सामावून घेण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष पावन आगदारी यांनी वणी क्षेत्राचे अप्पर महा व्यवस्थापक पिसारेड्डी यांना निवेदन देऊन केली आहे. आठ दिवसात कामावर न घेतल्यास वाहतूक बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला.
मागील तीन वर्षांपासून वेकोलि वणी क्षेत्रातील कोलगाव कोळसा खाणीत ओबी व कोळसा उत्खननाचा कंत्राट सद्भाव इंजिनिअरिंगकडे होता. त्या कंपनीत चालक वाहक सुपरवायझर असे स्थानिक बेरोजगार कार्यरत होते. मात्र सद्भाव इंजिनिअरिंगच्या ऐवजी वेकोलिने हरिराम गोतारा एचआरडि ट्रान्स्पोटिंग कंपनीला दिला. सद्भाव कंपनीमध्ये तीन वर्षांपेक्षा अधिककाळ काम करणाऱ्या कामगारांना नवनियुक्त एचआरडी ट्रान्स्पोटिंग कंपनीचे व्यवस्थापन काम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आक्रोश निर्माण झाला आहे.