जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:24 PM2018-03-11T23:24:46+5:302018-03-11T23:24:46+5:30

जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी फोडविण्यासाठी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आरखड्या सादर केला.

Traffic on the Jatpura Gate can be broken | जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी फुटणार

जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी फुटणार

Next
ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने केली पाहणी

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी फोडविण्यासाठी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आरखड्या सादर केला. या आरखड्यावर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी सगिती गठित केली. या समितीने जटपुरा गेट परिसराला भेट देवून पाहणी केली. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग निघण्याची शक्यता आहे.
पाहणीदरम्यान किशोर जोरगेवार यांच्यासह जिल्हाधिकारी यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गठित केलेल्या समितीतील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, शहर अभियंता मनपा तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची उपस्थिती होती. तसेच रमणिक चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, सदानंद खत्री, रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय जयसवाल, दीपक दापके, जनचेतना जागर संस्थेचे अध्यक्ष अशोक तुमराम, विनोद गोल्लजवार यांची उपस्थिती होती.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संपुर्ण मार्गाचे निरीक्षण केले आणि किशोर जोरगेवार यांनी सुचविलेल्या पयार्याबाबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, मनपा शहर अभियंता तसेच उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पाहणी करून येणाऱ्या दोन दिवसात किशोर जोरगेवार यांनी सदर केलेल्या आराखड्याप्रमाणे वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यात येईल, असे उपस्थितांना सांगितले. त्यामुळे लवकरच येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
वळण मार्ग सुरू करण्याचा आराखडा
जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी किशोर जोरगेवार यांनी १ महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर वळण मार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी विविध संघटना पदाधिकाºयांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी समिती गठित केली.

Web Title: Traffic on the Jatpura Gate can be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.