नवनिर्मीत पुलाच्या बाजुची माती खचल्याने वाहतुक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:28 AM2021-09-19T04:28:20+5:302021-09-19T04:28:20+5:30

कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी पोंभूर्णा : पोंभूर्णा येथील आयटीआयजवळ असणाऱ्या नाल्यावर यावर्षी पूल बांधण्यात आला. परंतु पुलाच्या दोन्ही बाजुला ...

Traffic was closed due to soil erosion on the side of the newly constructed bridge | नवनिर्मीत पुलाच्या बाजुची माती खचल्याने वाहतुक बंद

नवनिर्मीत पुलाच्या बाजुची माती खचल्याने वाहतुक बंद

googlenewsNext

कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी

पोंभूर्णा : पोंभूर्णा येथील आयटीआयजवळ असणाऱ्या नाल्यावर यावर्षी पूल बांधण्यात आला. परंतु पुलाच्या दोन्ही बाजुला माती आणि मुरुम यांचा भरणा योग्य पध्दतीने न भरल्यामुळे ती माती पहिल्याच पावसात वाहून गेली. फक्त जाण्या-येण्यासाठी केवळ एकरी मार्ग शिल्लक होता. त्या मार्गावर शुक्रवारी सांयकाळी जड वाहन फसल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण झाला. मूल-पोंभूर्णा मुख्य मार्ग बंद झाल्याने अनेकांना अडचण निर्माण झाली.

मागील जुलै महिन्यात अशाच प्रकारचा अडथळा निर्माण झाला होता. वारंवार अशा प्रकारच्या घटनांमुळे जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन संबंधित पुलाच्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जनतेतर्फे केली जात आहे. संबंधित अधिकारी राजेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता योग्य ती चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. आजमितीस संबंधित ठेकेदाराने मुरूम भरण्याचा थातूरमातूर प्रयत्न केला असला तरी तो पूल नागरिकांसाठी मृत्यूला आमंत्रण देणारा ठरेल.

180921\img-20210917-wa0017.jpg

पुलीयाजवळची माती खचल्याने वाहतूकीला झालेला अडथळा

Web Title: Traffic was closed due to soil erosion on the side of the newly constructed bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.