बेरोजगारांना प्रशिक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:57+5:302021-06-02T04:21:57+5:30
ऑटो चालकांना पार्किंग उपलब्ध करून द्यावी चंद्रपूर : दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक ऑटोचालकांना ऑटो पार्क ...
ऑटो चालकांना पार्किंग उपलब्ध करून द्यावी
चंद्रपूर : दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक ऑटोचालकांना ऑटो पार्क करण्यासाठी जागा नसल्याने ते अनेकवेळा रस्त्यावर पार्किंग करून आपला व्यवसाय करतात. त्यामुळे शहरातील खुल्या जागेमध्ये त्यांच्यासाठी पार्किंग व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
होर्डिंगमुळे शहराच्या सौंदर्यात बाधा
चंद्रपूर : शहरातील विविध चौकांमध्ये अनधिकृतपणे होर्डिंग लावले जात आहेत. यामुळे चौकांच्या सौंदर्यीकरणात बाधा निर्माण होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन बॅनर हटवावेत, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ परिसरातील रस्त्यांवर खड्डे असून ते बुजविण्याची मागणी केली जात आहे.
भाजीपाल्याचे भाव कडाडले
चंद्रपूर : कोरोनाच्या दहशतीमुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. जीवनावश्यक वस्तू व अति महत्त्वाच्या सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची वेळ आहे. किरकोळ भाजीपाल्याच्या दराने प्रति किलो शंभरी ओलांडली आहे. लसूण, कांदे, टमाटर, आलू, मिरची वाट्टेल त्या भावाने विकली जात आहे. याचा फटका गरिबांना बसत आहे.
पडोली चौकातील अतिक्रमण हटवा
चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. सध्या संचारबंदी असल्यामुळे सदर चौकामध्ये गर्दी कमी आहे. असे असले तरी अन्य वेळी हा चौक सतत गजबजलेला असतो.
नाल्याचा उपसा करण्याची मागणी
घुग्घुस : येथील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ तयार झाला असून, पाणी वाहून जाण्यास अडचण होत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नालीचा उपसा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे धोका
घुग्घुस : प्लास्टिक बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होताना दिसून येत आहे. गावात असलेल्या कचराकुंडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून येत आहे. परिणामी जनावरांना धोका होण्याची शक्यता आहे.