प्रशिक्षकच शोधतो खेळांडूची प्रतिभा -पोटदुखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:04 AM2017-09-02T00:04:14+5:302017-09-02T00:04:30+5:30
प्रशिक्षक उत्कृष्ट खेळाडू तयार करतात. त्याकरिता त्यांच्या पालकानेसुद्धा सहकार्य करावे. खेळांडूना ओळखण्याची क्षमता केवळ प्रशिक्षकामध्येच असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रशिक्षक उत्कृष्ट खेळाडू तयार करतात. त्याकरिता त्यांच्या पालकानेसुद्धा सहकार्य करावे. खेळांडूना ओळखण्याची क्षमता केवळ प्रशिक्षकामध्येच असते. उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केलेले खेळाडू जागतिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात व देशाचे नावलौकीक करतात. त्याकरिता खेळांडूनी सदैव सराव करीत कठारे मेहनत घ्यावी. मेजर ध्यानचंद यांनी कठोर मेहनत घेतली व देशाला आॅलंपिकमध्ये हॉकीत सूवर्णपदके मिळवून दिली. त्यांच्या अंगी असलेले देशप्रेम, खेळाडूभावना ही प्रत्येक खेळांडूच्या अंगी असणे अतिशय गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम पोटदुखे यांनी केले.
सरदार पटेल महाविद्यालयामध्ये मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शारिरीक शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे राष्टÑीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शैक्षणिक सत्र २०१६-१७ तील खेळांमध्ये अप्रतिम कामगिरी केलेल्या राष्टÑीय, राज्यपातळी तसेच अखिल भारतीय विद्यापीठ व विजेता संघातील खेळांडूना ट्रॅकसुट, खेळांचे शूज व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. १३ वेळा ग्रिनीज बुकमध्ये नाव नोंदविलेले, अमेरिकेचा प्रेसिडेंसीयल चॅम्पियन अवार्ड विजेते आणि अमेरिकेचे राष्टÑपती बिल क्लिंटन, जार्ज बुश, बराक ओबामाद्वारा सन्मानित मार्शल आर्ट तायकांडोचे आठवे डॉन ग्रॅडमास्टर डॉ. एम. जयंथ रेड्डी यांच्या हस्ते सर्व खेळांडूना सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एम. जयंथ रेड्डी, सचिव प्रशांत पोटदुखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पी. इंगोले, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर, आंतरराष्टÑीय तायकोंडो खेळाडू आर. माधमशेट्टीवार, शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर, आंतरराष्टÑीय तायकांडो खेळाडू आर. गजेंद्रकुमार, अब्दुल खलील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कुलदीप आर.गोंड यांनी केले तर आभार शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. संजय गर्गेलवार व महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.