कारमेल अकादमीच्या विद्यार्थ्यांचे नासा येथे प्रशिक्षण

By admin | Published: July 8, 2015 01:23 AM2015-07-08T01:23:58+5:302015-07-08T01:23:58+5:30

बी.जे.एम. कारमेल अकादमीच्या तेरा विद्यार्थ्यांनी उपप्राचार्य फादर बिनॉय यांच्यासह तेरा दिवसांची अमेरिका येथे शैक्षणिक सहल केली.

Training for Caramel Academy students at NASA | कारमेल अकादमीच्या विद्यार्थ्यांचे नासा येथे प्रशिक्षण

कारमेल अकादमीच्या विद्यार्थ्यांचे नासा येथे प्रशिक्षण

Next

चंद्रपूर : बी.जे.एम. कारमेल अकादमीच्या तेरा विद्यार्थ्यांनी उपप्राचार्य फादर बिनॉय यांच्यासह तेरा दिवसांची अमेरिका येथे शैक्षणिक सहल केली. अमेरिकेत नासा, वाशिंग्टन, व्हाइट हाऊस, न्युयार्क शहर व नायगारा धबधबा या स्थळांना भेटी देण्यात आले. विद्यार्थ्यांनी नासा येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यासाठी त्यांना बारबरा मार्गन या प्रसिद्ध अ‍ॅस्ट्रानेटचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांना वेळ घालवला आला. तसेच त्यांनी युनिव्हर्सल स्टुडिओ व सी- वर्ल्ड येथे भेट दिली. यावेळी अमेरिका राष्ट्रध्यक्षांचे निवासस्थान असलेले व्हाइट हाऊस पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. स्वप्नवत असलेला स्टॅच्यु आॅफ लिबर्टी हा पुतळा विद्यार्थ्यांनी पाहिला. यावेळी शाळेचे प्राचार्य फादर जॉर्ज सी.सी. व उपप्राचार्य फादर बिनॉय उपस्थित होते.

Web Title: Training for Caramel Academy students at NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.