स्वच्छता अॅपबाबत कर्मचाºयांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:56 AM2020-12-11T04:56:42+5:302020-12-11T04:56:42+5:30
चंद्रपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महानगर पालिकातील चार झोनमध्ये कार्यरत कर्मचाºयांना ...
चंद्रपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महानगर पालिकातील चार झोनमध्ये कार्यरत कर्मचाºयांना स्वच्छता अॅपसंदर्भात प्रशिक्षण शिबिर तसेच नागरिकांनाही ओला व सुका कचरा कसा वेगळा करावा याची माहिती देण्यात आली.
मनपातर्फे ओडीएफ व कचरामुक्त शहर करण्यासाठी विविध जनजागृती कार्यकम सुरू आहेत. सफाई कामगार, घंटागाडी कामगार व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षित केल्या जात आहे. स्वच्छता अॅप अॅक्टिवेशन व वापर करणे, नागरिकांकडून येणाºया तकारींचे निवारण करणे, शहर स्वच्छता, कोविड १९ तसेच शहर निरोगी ठेवताना स्वत:च्या आरोग्याबाबत कशी काळजी घावी, ओला व सुका कचरा वेगळा करून घेणे, कचºयाचे प्रकार इत्यादीबाबत प्रशिक्षण देण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक उदय मैलारपवार, विवेक पोतनुरवार, प्रदीप मडावी उपस्थित होते.