मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:53+5:302021-08-22T04:30:53+5:30

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, बी. एच. हुडा, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस उपअधीक्षक मिलिंद ...

Training young people to avoid human-wildlife conflict | मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देणार

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देणार

Next

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, बी. एच. हुडा, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार विजय पवार, जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, वनसंरक्षक दलाचे प्रमुख बंडू धोत्रे, राजेश कांबळे उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, संवदेनशील १५० गावांतील तरुणांची निवड करावी. वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी किंवा मृत होत आहेत. वाघ जनावरावर हल्ला करतो. आपल्या जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात गुराखी वाघाचा प्रतिकार करतो. या संघर्षातून गुराखी वाघाचा शिकार ठरत आहे. मात्र अशावेळी गुराख्यांनी जनावराला सोडून आपला जीव वाचवावा. वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांचा मोबदला वनविभागाकडून मिळतो. पण, मानवी जीव जाणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बॉक्स

मुखर्जी योजना आता १५० गावांत

ब्रह्मपुरी वन क्षेत्रात ११४ वाघ, ११० बिबट्यांचा वावर आहे. वाघांचे स्थानांतरण करण्याबाबत धोरण निश्चित करावे. जनवन विकास योजनेतंर्गत शेतीला सोलर व चॅनलिंग कुंपण करावे, जंगलाला लागून असलेल्या शेतावर जाऊ नये म्हणून त्यासाठी दहा हजारांची मदत, श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेची व्याप्ती वाढवून अतिरिक्त १५० गावांत ही योजना राबविण्यात येईल. वाघाला पळविण्यासाठी विशेष काठी खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बॉक्स

तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे बैठक

मानव- वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको टुरिझमबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी-सिंदेवाही परिसरात जंगल सफारी, पर्यटनक्षेत्र व रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि संवेदनशील १२५ गावांना दरवर्षी २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Web Title: Training young people to avoid human-wildlife conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.