कृषी विज्ञान केंद्रातर्फे युवकांसाठी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:48 PM2017-11-11T23:48:53+5:302017-11-11T23:49:12+5:30
कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण युवकांसाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय या विषयावर २० दिवसांचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन कार्यक्रम समन्वयक प्रा.पी.आर. धुमाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विषय निर्देशक म्हणून प्रा. किरण मांडवडे उपस्थित होते. यावेळी डॉ. मुकुंद पातोंड, अभिजीत पांडे, डॉ. स्वप्नील खंडाते, डॉ. दिगंबर उंदरटवाड, डॉ. विक्रम, डॉ. डी.एम. चौधरी, हिरा निहाते यांनी ग्रामिण युवकांना पशुसंवर्धनाचे महत्व, व्यवस्थापन, व्यवसायात येणाºया समस्या व त्यांचे आकलन, जनावरांना होणारे रोग, त्यावरील निदान व उपाययोजना, डेअरी व्यवसाय उभा करण्याकरिता वित्त पुरवठ्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे यावर मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना पशुसंवर्धनावर आधारित पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रशिक्षणार्थीना निर्माण केलेल्या मदर डेअरी आणि गोटफॉर्म या ठिकाणी भेट देण्यात आली. सदर प्रशिक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील ३३ युवक व युवतींनी सहभाग घेतला. प्रशिक्षण यशस्वीरीत्या राबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील सर्व कर्मचाºयांनी प्रयत्न केले.