गुरुजींच्या बदलीने भाऊक झाले गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:24 AM2019-07-15T00:24:18+5:302019-07-15T00:25:02+5:30
उपक्रमशिल शिक्षण म्हणून जिल्ह्यात ओळख असलेले, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षण जे.डी. पोटे यांची जिल्हा परिषद शाळा वायगाव येथून पोंभूर्णा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावात बदली झाली. यानिमित्त वायगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना निरोप देत सपत्निक सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उपक्रमशिल शिक्षण म्हणून जिल्ह्यात ओळख असलेले, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षण जे.डी. पोटे यांची जिल्हा परिषद शाळा वायगाव येथून पोंभूर्णा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावात बदली झाली. यानिमित्त वायगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना निरोप देत सपत्निक सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ भाऊक झाले. एवढेच नाही, तर काहींना त्यांना निरोप देतांना अश्रू अनावर झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकर सुर्तीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख रामराव हरडे, माजी सरपंच राखी करपते, विलास तोडासे, दुधारा शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र गिरडकर, निंबाळा शाळेचे शिक्षक राजेंद्र अनमदवार, वायगावच्या मुख्याध्यापिका अश्विनी साकरकर, शाळा व्य.स.अध्यक्ष पुरूषोत्तम पेंद्राम, बिजेंद्र सोयाम, सुर्यभान पेंद्राम, हर्षणा बागडे, दिपीका सिद्धमशेट्टीवार, सचिन पेंद्राम, लता उईके, सरू वेलादी, प्रतिभा झाडे, सरदार झाडे, मुन्नी आत्राम, सुनंदा पेंद्राम आदिंची यावेळी उपस्थिती होती. यावेळी केंद्रप्रमुख हरडे यांनी पोटे गुरुजींच्या कार्याची माहिती दिली.
उपक्रमशिल तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ते परिचित असल्याचे सांगून अगदी छोटीशी शाळा असुनही त्यांच्या काळात शाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष, सिईओ, शिक्षण सभापती, डायटचे प्राचार्य आदींनी भेट दिल्याचा उल्लेख करीत विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये त्यांचे मेहनत असल्याचा उल्लेख त्यांनी याप्रसंगी केला.
यावेळी अन्य मान्यवरांनीही पोटे गुरुजींबद्दल गौरोद्गार काढले. याप्रसंगी जे.डी.पोटे तसेच त्यांच्या पत्नी बोर्डा शाळेतील सहाय्यक शिक्षिका निरंजना पोटे यांचा वायगाव शाळा आणि ग्रामस्थांतर्फे शाल, श्रीफळ तसेच विठ्ठल- रुख्मीनीची मूर्ती देऊन सत्कार केला. याप्रसंगी शिक्षक पोटे यांनी ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच शाळेची प्रगती झाल्याचे सांगितले. तसेच सहकारी शिक्षक संघर्ष कुंभारे यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक व संचालन सहाय्यक शिक्षक संघर्ष कुंभारे, आभार मुख्याध्यापिका साकरकर यांनी मानले. याप्रसंगी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.