अनेक ग्रामसेवकांचे स्थानांतरण प्रतिनियुक्त्या नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:31 AM2021-08-28T04:31:22+5:302021-08-28T04:31:22+5:30

वरोरा तालुक्यातील माढेळी, नागरी, टेमुर्डा, शेगाव, चारगाव आदी ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नुकतेच प्रशासकीय स्थानांतरण करण्यात आले. ...

Transfer of many Gram Sevaks is not a deputation | अनेक ग्रामसेवकांचे स्थानांतरण प्रतिनियुक्त्या नाही

अनेक ग्रामसेवकांचे स्थानांतरण प्रतिनियुक्त्या नाही

Next

वरोरा तालुक्यातील माढेळी, नागरी, टेमुर्डा, शेगाव, चारगाव आदी ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नुकतेच प्रशासकीय स्थानांतरण करण्यात आले. ज्या गावांची लोकसंख्या सहा ते दहा हजाराच्या घरात आहे. तिथल्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे स्थानांतरण झाले. परंतु त्यांच्या जागेवर कोण येणार त्या नियुक्त्या अद्याप करण्यात आल्या नाही. वरोरा तालुक्यातून ज्या ग्रामसेवकांचे स्थलांतर झाले त्यांना येत्या काही दिवसात दुसऱ्या तालुक्यात रुजू व्हावे लागणार आहे. त्यामुळे या मोठ्या ग्रामपंचायतीचा पदभार प्रभारी ग्रामसेवकांकडे द्यावा लागणार आहे. प्रभारी ग्रामसेवक पूर्णवेळ त्या गावाला देऊ शकणार नाही, त्यामुळे त्या गावांच्या विकासाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोट

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे स्थानांतरण झाले. त्या जागेवर प्रतिनियुक्त्या कराव्यात. त्यानंतरच त्यांना सोडण्यात यावे.

-राजेंद्र चिकटे, जिल्हा उपाध्यक्ष सरपंच संघटना.

Web Title: Transfer of many Gram Sevaks is not a deputation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.