म्हाडाची घरे हस्तांतरीत करा : अहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:47 AM2018-04-11T01:47:55+5:302018-04-11T01:47:55+5:30
सन २०२२ पर्यंत सर्व सुविधांनी युक्त असलेली घरे उपलब्ध करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लक्ष्य गाठण्याचे धोरण अंगिकारण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सन २०२२ पर्यंत सर्व सुविधांनी युक्त असलेली घरे उपलब्ध करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लक्ष्य गाठण्याचे धोरण अंगिकारण्यात आले. याचाच भाग म्हणून चंद्रपूर महानगरात आवास योजनेसाठी निर्धारित आवास लक्ष्यांकाची तातडीने पूर्तता करण्यासाठी १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनापर्यंत १०० लाभार्थ्यांना म्हाडाच्या वतीने बांधण्यात आलेली घरे हस्तांतरीत करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विविध खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला घरे या योजनेचा मनपा आयुक्तांकडून सविस्तर आढावा घेतला. यावेळी आमदार नाना शामकुळे, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक झा, मनपा आयुक्त संजय काकडे आदी उपस्थिती होती. यावेळी ना. अहीर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर व नामंजूर कर्ज प्रकरणांचाही आढावा घेत बँकांच्या अधिकाºयांकडून माहिती जाणून घेतली. नामंजूर कर्ज प्रकरणातील त्रुटी दूर करून उर्वरित कर्ज प्रकरणे मार्गी लावण्याचे निर्देश विविध बँकांच्या अधिकाºयांना दिले. जिल्हा अग्रणी बँकेने या प्रकरणात विशेष लक्ष घालून प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढावी, असेही निर्देश दिले. मंजुरीप्राप्त प्रकरणातील लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे तातडीने उपलब्ध करावे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या विलंबाची दखल घ्यावी, अशा सुचनाही दिल्या.