गोपानीतील सेल्गा कंपनीकडून कामगारांची परप्रांतात "ट्रान्सफर"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:58+5:302021-09-18T04:30:58+5:30

वतन लोणे घोडपेठ : येथून जवळच असलेल्या ताडाळी येथील गोपानी आयरन ॲण्ड पॉवर या कारखान्याने मागील आठवड्यात कंत्राटदाराचे कंत्राट ...

"Transfer" of workers from Selga Company in Gopani to foreign countries | गोपानीतील सेल्गा कंपनीकडून कामगारांची परप्रांतात "ट्रान्सफर"

गोपानीतील सेल्गा कंपनीकडून कामगारांची परप्रांतात "ट्रान्सफर"

Next

वतन लोणे

घोडपेठ : येथून जवळच असलेल्या ताडाळी येथील गोपानी आयरन ॲण्ड पॉवर या कारखान्याने मागील आठवड्यात कंत्राटदाराचे कंत्राट बंद केल्याने अंदाजे ४५० कामगारांना बेरोजगार व्हावे लागले होते. मात्र यापैकी सेल्गा स्टील इंडस्ट्रीज या कंत्राटदाराने आपल्या कामगारांची इतर राज्यात बदली केली आहे. याची सूचना कारखान्याच्या बाहेर असलेल्या नोटीस बोर्डवर शुक्रवारी पहाटे लावण्यात आली. त्यामुळे व्यवस्थापनाचा हा पवित्रा कामगारांचे आंदोलन दडपण्यासाठी असल्याचे मत कामगारांत व्यक्त करण्यात येत आहे.

कारखान्यात काम नसल्याचे कारण देत सुरुवातीला १२० कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी सर्वच कंत्राटदारांचे कंत्राट संपवून कामगारांना बेरोजगार करण्यात आले. त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी सहायक कामगार आयुक्त यांच्या कक्षामध्ये या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र आता यापैकी सेल्गा स्टील इंडस्ट्रीज या कंत्राटदाराने आपल्या एकूण १०३ कामगारांची बदली करण्यात येत असल्याबाबतची सूचना कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या फलकावर प्रसिद्ध केली आहे. ही बदली सेल्गा स्टील इंडस्ट्रीजच्या टाटा स्टील लिमी. ओरिसा, जेएसडब्ल्यू कर्नाटका, टाटा स्टील लिमी. झारखंड, जिंदाल स्टील ॲण्ड पॉवर लिमि. ओरिसा व जिंदाल स्टेनलेस स्टूल लिमि. ओरिसा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कामगारांची ही बदली तात्काळ स्वरूपाची असून सात दिवसांच्या आत कामावर रुजू होण्याची सूचनाही कामगारांना करण्यात आलेली आहे.

कोट

कामगारांची दिशाभूल करून कामगारांत फूट पाडण्याचा प्रयत्न गोपानी व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. एकही कामगार बदली करण्यात आलेल्या परप्रांतात कामासाठी जाणार नाही. सोमवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर समोरची रणनीती ठरविण्यात येईल.

- दिनेश चोखारे

अध्यक्ष, गोपानी स्पंज आयरन कामगार संघटना, ताडाळी.

Web Title: "Transfer" of workers from Selga Company in Gopani to foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.