३९८ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:28 AM2021-07-29T04:28:13+5:302021-07-29T04:28:13+5:30
शासनाचा आदेश धडकल्यानंतर रविवार (दि. २५) पासून जिल्हा परिषद मधील ११ विभागांमध्ये वर्ग ३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात ...
शासनाचा आदेश धडकल्यानंतर रविवार (दि. २५) पासून जिल्हा परिषद मधील ११ विभागांमध्ये वर्ग ३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पहिल्या दिवशी पंचायत, वित्त, कृषी, शिक्षण विभागातील पात्र कर्मचारी बदली प्रक्रियेला सामोरे गेले. सोमवारी बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व महिला कल्याण तसेच सामान्य प्रशासन विभाग आणि मंगळवारी आरोग्य, सिंचन व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाली. बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक प्रमाणपत्रासह जि. प. च्या कन्नमवार सभागृहात दाखल झाले होते.
बॉक्स
असा आहे बदलीचा संवर्ग
जि. प. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१४ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, १०१ जणांच्या विनंती, ६६ बिगर नक्षलग्रस्त भागातून नक्षलग्रस्त भागात आणि सहा पंचायत समित्यांमध्ये बिगर नक्षलग्रस्त क्षेत्रात समतोल साधण्यासाठी १५ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अशा एकूण ३९८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बॉक्स
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा तिढा सुटला
गतवर्षीच बदली झालेल्या चार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथमिक) भारमुक्त केले नव्हते. तेव्हापासून हे अधिकारी तेथेच कार्यरत होते. सेवा ज्येष्ठता शून्य दाखविल्याने नवीन बदली प्रक्रिया दरम्यान त्यांची नाराजी होती. अखेर प्रशासनाने यावर नियमानुसार मार्ग काढून चारही शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
कोट
जि. प. संवर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया नियमानुसार घेण्यात आली. ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शी होती. बदली संदर्भात कुणाच्याही तक्रारी नाहीत. समुपदेशनाद्वारे पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
-श्याम वाखर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर