चार पीआय, १३ एपीआय व १० पीएसआयच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांचे आदेश निर्गमित 

By परिमल डोहणे | Published: August 29, 2024 09:13 PM2024-08-29T21:13:40+5:302024-08-29T21:13:50+5:30

चंद्रपूर : गोळीवर, हत्या व गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतांनाच नागपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप ...

Transfers of four PI, 13 API and 10 PSI; Superintendent of Police orders issued  | चार पीआय, १३ एपीआय व १० पीएसआयच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांचे आदेश निर्गमित 

चार पीआय, १३ एपीआय व १० पीएसआयच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांचे आदेश निर्गमित 

चंद्रपूर : गोळीवर, हत्या व गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतांनाच नागपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या दौऱ्यानंतर पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी बुधवारी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याचे आदेश जारी केले. १५ दिवसापूर्वी ५० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र आता पुन्हा ४ पोलिस निरीक्षक, १३ सहायक पोलिस निरीक्षक व १० पोलिस उपनिरीक्षक अशा एकूण २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी आवडीचे ठाणे मिळावे यासाठी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे पोलीस दलातील या बदल्या चर्चेत आहेत.

 जिवती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपुत यांची कोरपना येथे बदली झाली असून त्यांच्याजागी जिल्हा विशेष शाखेतील पाेलिस निरीक्षक कांचन पांडे यांची ठाणेदार पदी वर्णी लागली आहे. जिवती ठाण्याला पहिल्यांदाच महिला पाेलिस ठाणेदार मिळाल्या आहे. पोलिस स्टेशन घुग्घुसचे दुय्यम अधिकारी प्रदिप पुल्लरवार यांची सावली ठाणेदार पदी तर, रामनगर ठाण्याचे दुय्यम अधिकारी रमाकांत कोकाटे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे. चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीकक्ष राहुल गुहे यांची उमरी पोतदार ठाणेदार पदी, तर उमरी पोतदार येथील योगेश हिवसे यांची पडोली ठाणेदार पदी वर्णी लागली आहे.

नियंत्रण कक्षातील प्रविण सोनुने यांची पोलिस स्टेशन रामनगर येथे तर बल्लारपूर पोलिस ठाण्यातील दिपक कांक्रेडवार यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गजानन वाघोडे यांची पोलीस स्टेशन टेकामांडवा येथे ठाणेदार पदी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद श्याम भस्मे वरोरा, नियंत्रण कक्षाचे एपीआय निशांत भीमराव फुलेकर वरोरा, नियंत्रण कक्षाचे एपीआय पंकज अशोक बैसाणे चंद्रपूर सिटी, नियंत्रण कक्षाचे एपीआय हेमंत शंकरराव पवार राजुरा, नियंत्रण कक्षाचे एपीआय राजेंद्र देविदास गायकवाड बल्लारपूर, नियंत्रण कक्षाच्या एपीआय शीतल पवन खोब्रागडे ब्रह्मपुरी, चिमूर येथील एपीआय प्रमोद रासकर पाथरी ठाणेदार, पाथरी येथील ठाणेदार संगीता हेलोंडे तळोधी ठाणेदार पदी वर्नी लागली आहे. तर टेकामांडवा येथील पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार बल्लारपूर, वणी कॅम्प येथील पीएसआय हिराचंद नीलकंठ गवारे रामनगर, नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक शुभांगी राम पाटील भिसी, नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ देवाजी ठवकर सिंदेवाही, नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक मीनल कापगते बल्लारपूर, नियंत्रण कक्षातील तृप्ती खंडाईत चंद्रपूर सिटी, नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर ठाणेदार वणी कॅम्प, नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक मनोजकुमार रघुनाथ नाले ब्रह्मपुरी, बल्लारपूर येथील पोलीस उपनिरीक्षक वर्षा तुकाराम नेताम मूल, चिमूर येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक भाऊराव ठाकरे वरोरा येथे बदली करण्यात आली आहे. 

या बदल्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम लागतो का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Transfers of four PI, 13 API and 10 PSI; Superintendent of Police orders issued 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस