श्रमदानातून भादुर्णीचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:41 AM2018-04-23T00:41:26+5:302018-04-23T00:41:26+5:30

गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, ...

 Transfiguration of labor from labor | श्रमदानातून भादुर्णीचा कायापालट

श्रमदानातून भादुर्णीचा कायापालट

Next
ठळक मुद्देआत्मविश्वास वाढला : गावात लोकसहभागातून ५० लाखांचे काम

राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, या उद्देशाने भादुर्णीवासीयांनी श्रमदानातून गाव विकास साधण्याचा निर्णय घेतला आहे. गावात लोकसहभागातून तब्बल ५० लाख रुपयांचे काम करुन गाव विकासाला हातभार लावला आहे. प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने विशेष जनजागृती केल्याने गावाचा कायापालट होण्याला मदत मिळाली.
‘गाव करी ते राव न करी’ या उक्तीप्रमाणे लोकांना श्रमदानाचे महत्व पटले तर गावाचा विकास होण्याला कुणीही रोखू शकत नाही. मूल तालुक्यातील भादुर्णी या गावाची लोकसंख्या एक हजार ५१६ असून प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने गाव विकासासाठी जनजागृती करुन लोकांच्या मनात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गावातील युवक- युवती व वृद्धांना सोबत घेऊन गाव विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार केला. श्रमदानातून गावामध्ये स्वच्छ ग्राम, आदर्श ग्राम निर्मितीकरिता पिण्याच्या पाण्याचे नियोजन, शौच खड्ड्याद्वारे पाण्याची पातळी वाढविणे, घराघरातून निघणाऱ्या सांडपाण्याचे योग्य नियोजन करुन त्याचा शेतबाग, परसबाग फुलविणे, गोठ्यातील गाई-म्हशी व शेळ्या मेंढ्याच्या माध्यमातून निघणाऱ्या मलमुत्राचा वापर शेतात करुन शेती पिकासाला हातभार लावण्याचा प्रयत्नकरण्यात आला. घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे विलनीकरण करुन खताची निर्मिती करण्याविषयी तंत्रशुद्ध माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभु फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल गुळघाणे, सरपंच दिपीका शेंडे, उपसरपंच संतोष रेगुंडवार, सचिव अंकुश दडमल, स्वच्छता समितीचे अध्यक्ष लिलाधर शेंडे, प्रभुदास मांदाडे, अविनाश शेंडे, गोपाल सोनुले, अंकुश बावणे, अतुल बावणे व गावकरी गावविकासासाठी झटत आहेत.
गावात लागले सीसीटीव्ही कॅमरे
गावात श्रमदान व लोक वर्गणी गोळा करुन स्वच्छता, सौंदर्यीकरण, रस्ते, पाणी व इतर आवश्यक कामे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावात सर्वत्र स्वच्छता व आरोग्यदायी वातावरणांची निर्मिती झाल्याने गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलां. ग्रामपंचायतीकडून गावातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. शुद्ध पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविण्यात आले. सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट लावण्यात आले. शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे तयार करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनाकरिता घंटागाडीत ओला व सुका कचरा याचे विघटन करुन ओल्या कचºयापासून खत तयार करण्यात येत आहे.

Web Title:  Transfiguration of labor from labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.