मिनरल वाॅटरच्या खोक्यातून दारूची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:30 AM2021-02-24T04:30:15+5:302021-02-24T04:30:15+5:30
चंद्रपूर : दारूविक्रेते दारूतस्करीसाठी नानाविध शक्कल लढवत असल्याचे अनेकदा उघड झाला. एका तस्कराला चक्क मिनरल वाॅटरच्या खोक्यातून दारूची तस्करी ...
चंद्रपूर : दारूविक्रेते दारूतस्करीसाठी नानाविध शक्कल लढवत असल्याचे अनेकदा उघड झाला. एका तस्कराला चक्क मिनरल वाॅटरच्या खोक्यातून दारूची तस्करी करताना पडोली पोलिसांनी पकडले. एका पिकअप वाहनातून पडोली पोलिसांनी १९ बॉक्स विदेशी दारूसह पाच लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पडोली चौकात मंगळवारी केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. गणेश श्यामलाल श्रीवास्तव (४८), सुनील अलीप्रसाद उइके (४४) दोघेही रा. नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
एका पिकअप वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून पडोलीचे पोलीस निरीक्षक मुर्लीधर कासार यांच्या नेतृत्वात पडोली मुख्य चौकात नाकाबंदी केली. यावेळी संशयित वाहन एमएच ४९ एटी ६७७० येताच त्याला थांबवून झडती घेतली. वाहनात मिनरल वॉटरचे खोके होते. त्या खोक्याची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारु आढळून आली. पोलिसांनी दोन लाख ४३ हजार रुपये किंमतीच्या १९ पेट्या विदेशी दारु व वाहन असा एकूण पाच लाख ४३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक कासार यांच्यासह चंदू ताजणे, सुरेंद्र खनके, स्वप्नील बुरीले, संदीप वासेकर, सुमित बरडे, अजय दरेकर आदींनी केली.