टीपी गोंडपिपरीची वाहतूक बल्लारपूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:07+5:302021-09-27T04:30:07+5:30

बल्लारपूर : तालुक्यातील पळसगावजवळील एका गोदामाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेले मुरुमाने भरलेले तीन हायवा ट्रकची चौकशी करून अवैध ...

Transport of TP Gondpipri in Ballarpur taluka | टीपी गोंडपिपरीची वाहतूक बल्लारपूर तालुक्यात

टीपी गोंडपिपरीची वाहतूक बल्लारपूर तालुक्यात

Next

बल्लारपूर : तालुक्यातील पळसगावजवळील एका गोदामाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेले मुरुमाने भरलेले तीन हायवा ट्रकची चौकशी करून अवैध वाहतूक आढळल्यामुळे उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली.

हायवा ट्रक राजुरा येथील एका पुढाऱ्याच्या मालकीचे असल्याचे समजते. रेती, मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यावरविरुद्ध उपविभागीय अधिकारी यांची पहिलीच मोठी कारवाई असल्यामुळे रेती, मुरुम तस्करांचे धाबे दणाणले आहे. बल्लारपूर तालुक्यात सध्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांचा पीक पाहणीचा दौरा सुरु आहे. शनिवारी त्या एनबोडी इटोली. मानोरा, कवडजई, पळसगाव येथील पीक पाहणी करून जात असताना येनबोडी फाट्याजवळ एका गोडाऊनच्या समोर रेती, मुरुमाने भरलेले तीन हायवा ट्रक क्रमांक एमएच ३४-४० एन २२४९ व एमएच ३४ बीजी ९०९८ आणि एक हे उभे असलेले दिसून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहतूक परवाना गोंडपिपरीचा दिसून आला. वाहतूक बल्लारपुरात होत असल्याचे निर्देशांकात आले. हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय त्या गोडाऊनचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडे रेती वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. यामुळे कारवाई करण्यात आली.

260921\20210926_084033.jpg

एसडिओ कार्यालयासमोर जप्त केलेले हायवा ट्रक

Web Title: Transport of TP Gondpipri in Ballarpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.