ताडपत्री न झाकताच बांधकाम साहित्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:33 PM2019-07-08T22:33:12+5:302019-07-08T22:34:42+5:30

शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे.

Transportation of construction materials without tadpattri | ताडपत्री न झाकताच बांधकाम साहित्याची वाहतूक

ताडपत्री न झाकताच बांधकाम साहित्याची वाहतूक

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : अपघात झाल्यास जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची रस्त्यावर गर्दी असते. अनेकवेळा वाहनातून बांधकाम साहित्य रस्त्यावर पडतात. याकडे संबंधित विभागाने विशेष लक्ष देवून ताडपत्री न लावता बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.
शासनाच्या महसूल व वनविभागाने काही वर्षांपूर्वीच परिपत्रक काढून गौण तसेच इतर साहित्याची वाहतूक करताना ट्रक व ट्रॅक्टरची उंची वाढवून ताडपत्री झाकण्याचे आदेश दिले आहे. मात्र याकडे वाहनधारक तसेच वाहक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र आहेत.
अनेकवेळा क्षमतेपेक्षा जास्त साहित्य नेण्याचा प्रकारही येथे सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ट्रक व इतर वाहनांच्या अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकवेळा वाहनातील साहित्य रस्त्यावर पडत असल्याने अन्य वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. धावत्या वाहनामुळे मागे असणाºया वाहनधारकांच्या डोळ्यात रेती तसेच धुळ जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यांची क्षमता नसतानाही अनेकवेळा जडवाहतूक केली जात असून वाहन चालक वाहतूक परवाना न बाळगता गौण खनिजाची वाहतूक करतात.
चंद्रपूर-नागपूर, मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी, जिवती-कोरपना मार्गावर मोठ्या प्रमाणात जडवाहतूक तसेच ताडपत्री न झाकता वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक तसेच प्रादेशित परिवहन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
पालकांनो सावधान
सध्या शाळा-महाविद्यालय सुरु झाले आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी आॅटो तसेच इतर वाहनाचा आधार घेत आहे. मात्र आपले पाल्य किती सुरक्षित आहे, हे पालकांनी तपासणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या अनेक आॅटोंना जाळी बसवलेली नसल्याने एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे. आॅटोेचालकाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आॅटोत बसविले काय, हे बघणे गरजेचे आहे. तसेच आॅटोचालकाला काही व्यसन आहे का, असेल तर आपल्या पाल्याला त्या आॅटोमध्ये न पाठविता दुसºयाची निवड करावी तसेच शाळा प्रशासनालाही आॅटोचालकाची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जड वाहतूक
रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जड वाहतूक केल्याने रस्त्यावर खड्डे पडतात. तसेच किनाऱ्यावर व वळणावर रस्ते तुटतात. दगडाची भुकटी देखील हवेत उडते. यावर उपाययोजना म्हणून रस्त्याची दुरुस्तीचा प्रश्न उभा ठाकतो. त्यामुळे या वाहतुकीवर आळा घालावा तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.

Web Title: Transportation of construction materials without tadpattri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.