ट्रॅव्हल्स्चा अपघात ; पाच जण जखमी
By admin | Published: July 22, 2016 01:03 AM2016-07-22T01:03:32+5:302016-07-22T01:03:32+5:30
नागपूर-चंद्रपूर मुख्य महामार्गावरील कोंढा फाट्याजवळ समोरुन भरधाव येणाऱ्या डी.एन.अर ट्रॅव्हल्स्ची टाटा एस चारचाकी वाहनाला धडक बसली.
कोंढा फाट्यावरील घटना : चारचाकीला धडक
भद्रावती : नागपूर-चंद्रपूर मुख्य महामार्गावरील कोंढा फाट्याजवळ समोरुन भरधाव येणाऱ्या डी.एन.अर ट्रॅव्हल्स्ची टाटा एस चारचाकी वाहनाला धडक बसली. या अपघातात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजता घडली.
एम.एच. ३४ ए.बी. ६९०३ या क्रमांकाचे टाटा एस वाहनाचे चालक अमन उल्हास झाडे (२१) रा. भटाडी हा चंद्रपूरहून वरोऱ्याकडे जात असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्याने आपले वाहन द्विभाजकावर चढविले. त्याच वेळेस विरुद्ध दिशेने येणारी एम.एच. ३४ ए.व्ही. १३७७ या क्रमांकाच्या डी.एन.आर. ट्रॅव्हल्स्च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणल्याने धडक बसली. यात टाटा एसचा चालक अमन झाडे हा गंभीर जखमी झाला असून ट्रॅव्हल्स् मधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र ट्रॅव्हस चालकाने आपले वाहन घटनास्थळावरुन हलविल्याने यातील जखमींची नावे कळू शकली नाही. या अपघातातील दोन्ही चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये करीत आहेत. या अपघातामुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावर तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. (शहर प्रतिनिधी)