भद्रावती ते कन्याकुमारी मोटारसायकल यात्रा
By admin | Published: April 24, 2017 01:04 AM2017-04-24T01:04:33+5:302017-04-24T01:04:33+5:30
आदिनाथ गुरूमाऊली सेवाग्राम हबरबडी (कांढळी) व आध्यात्मिक मंडळच्यावतीने भद्रावती ते कन्याकुमारीपर्यंत व्यसनमुक्तीच्या प्रचाराकरिता नुकतीच मोटारसायकल यात्रा काढण्यात आली.
व्यसनमुक्तीसाठी प्रचार : शांती संदेशाचा प्रसार
आयुध निर्माणी (भद्रावती) : आदिनाथ गुरूमाऊली सेवाग्राम हबरबडी (कांढळी) व आध्यात्मिक मंडळच्यावतीने भद्रावती ते कन्याकुमारीपर्यंत व्यसनमुक्तीच्या प्रचाराकरिता नुकतीच मोटारसायकल यात्रा काढण्यात आली.
ही शांती संदेश यात्रा २० दिवसांत पूर्ण झाली. भद्रावती येथील गवराळाच्या वरदविनायकाचे दर्शन घेऊन या यात्रेला २४ मार्च रोजी सुरूवात करण्यात आली. संत शेषानंद पांडे यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा व्यसनमुक्ती, पर्यावरण, सामाजिक एकता आणि शांती संदेश हा उपदेश घेऊन निघाली. यात सेवाग्राम बरबडीच्या ३२ उपासकांसह १६ मोटार सायकलचा समावेश होता. ही यात्रा वणी, पांढरकवडा, आदिलाबाद, हैदराबाद, बंगरूळू, रामेश्वरम्, कन्याकुमारी, त्रिवेदम्, कोच्ची, गोकर्ण, पंढरपूर, परळी बैजनाथ, अंबेजोगाई, उनकेश्वर, माहूर, बरबडी या मार्गाने प्रवास करून २० एप्रिलला पोहचले. या यात्रेत ४४७५ किलोमीटरचा प्रवास पुर्ण करण्यात आला. या यात्रेत आठ दाम्पत्यांचा समावेश होता.या रॅलीमध्ये सुदाम ठाकरे, ओमप्रकाश पांडे, मंदा पांडे, गजानन कुमरे, शोभाताई कुमरे, धर्मा बोंडे, साधना बोंडे, भोजराज कारेकार, सुनिता कारेकार, पूनम मरे, सुनील उमरे, रामप्यारी चंदेल, आदींचा समावेश होता. (वार्ताहर)