गणेशोत्सवासाठी ट्रॅव्हल्सची भाडेवाढ: ५० रुपये अधिक भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:08+5:302021-09-16T04:34:08+5:30
बॉक्स या मार्गावर धावतात सर्वाधिक ट्रॅव्हल्स चंद्रपूर-नागपूर चंद्रपूर-पुणे चंद्रपूर-औरंगाबाद चंद्रपूर-चिमूर चंद्रपूर-गडचिरोली ----- कोट मागील काही महिन्यांपासून डिझेलच्या दरामध्ये सततची ...
बॉक्स
या मार्गावर धावतात सर्वाधिक ट्रॅव्हल्स
चंद्रपूर-नागपूर
चंद्रपूर-पुणे
चंद्रपूर-औरंगाबाद
चंद्रपूर-चिमूर
चंद्रपूर-गडचिरोली
-----
कोट
मागील काही महिन्यांपासून डिझेलच्या दरामध्ये सततची वाढ होत आहे. त्यामुळे अल्प प्रमाणात भाडेवाढ झाली आहे. कोरोनामुळे पॅसेंजरही पूर्वीप्रमाणे प्रवास करीत नाही.
- ट्रॅव्हल्स व्यावसायिक
-------
मागील दीड वर्ष व्यवसाय ठप्प पडला होता. आता काही प्रमाणात सुरू झाला आहे. त्यातच सतत पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे, परंतु अद्यापही पाहिजे, त्या प्रमाणात प्रवासी प्रवास करीत नाही. डिझेल दरवाढीने अल्पवाढ केली आहे.
- ट्रॅव्हल्स व्यावसायिक
-------
प्रवाशांना फटका
सर्व सुरळीत असताना रेल्वे प्रशासनाने अद्यापही रेल्वे सुरू केली नाही. विशेष रेल्वेच्या नावाखाली मोठी लूट केली जात आहे. त्यातच आता पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे उदाहरण देत, खासगी ट्रॅव्हल्सच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
- प्रशांत सायमवार, प्रवासी.
-------
दिवसेंदिवस सर्वच बाबी महागड्या होत आहेत. गणपतीचा सण असल्याने घरी आलेलो, परंतु आता रेल्वे बंद असल्याने व खासगी वाहनाच्या वाढलेल्या दराने घरी येणेही परवडण्यासारखे नाही. त्यामुळे रेल्वे सुरू कराव्या, तसेच तिकिटांचे वाढलेले दर कमी करावे.
- सुशांत बुगदलवार, प्रवासी.