कोविड रूग्णांच्या उपचाराकडे गंभीरतेने लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 05:00 AM2021-05-29T05:00:00+5:302021-05-29T05:00:15+5:30
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे. रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यास मदत होईल. कोरोना महामारीचा कठीण काळ सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून रूग्णांच्या सेवेसाठी ती आजपासून उपलब्ध झाली आहे,
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व आरोग्य यंत्रणा अधिक बळकट व्हावी. रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने रूग्णांच्या उपचाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. स्थानिक विकास निधीतून सिंदेवाही व सावली नगर पंचायत येथे रुग्णवाहिकांचे लोकार्पण करताना ते बोलत होते.
यावेळी सिंदेवाहीच्या नगराध्यक्ष आशा गंडाते, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोंढे, तहसीलदार गणेश जगदाळे, विस्तार अधिकारी घाटोळे, वैद्यकीय अधिकारी झाडे, सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, विजय मुत्यलवार, संदीप गड्डमवार, बंडू बोरकुटे, दिनेश चिटनुरवार, तहसीलदार परिक्षित पाटील, न.प.मुख्याधिकारी मनिषा वझाडे, गटविकास अधिकारी निखिल गावडे उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे. रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यास मदत होईल. कोरोना महामारीचा कठीण काळ सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून रूग्णांच्या सेवेसाठी ती आजपासून उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रम अंतर्गत १८ लाख खर्च करून सिंदेवाही व सावली नगर पंचायतीना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.