कोविडवरील उपचार निःशुल्क करण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:33+5:302021-05-09T04:28:33+5:30

राजुरा : लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण देशाची तथा राज्याची आर्थिक परिस्थिती ठप्प झाली आहे. या बिकट परिस्थितीचा सर्वात जास्त ...

Treatment of covid should be done free of cost | कोविडवरील उपचार निःशुल्क करण्यात यावे

कोविडवरील उपचार निःशुल्क करण्यात यावे

Next

राजुरा : लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण देशाची तथा राज्याची आर्थिक परिस्थिती ठप्प झाली आहे. या बिकट परिस्थितीचा सर्वात जास्त आर्थिक ताण सामान्य व गरीब जनतेला पडला आहे. आजच्या स्थितीत गरीब व सामान्य जनता दोन वेळचे अन्नासाठी धावपळ करीत आहे.

अशातच राज्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये उपचाराच्या नावाखाली प्रचंड लुटमार सुरू असल्याचे दिसून येत आहे. तथा जनतेची आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे अनेक रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे चित्रही दिसून येत आहे.

त्यामुळे सामान्य जनतेला जगावे की मरावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. यामुळे राजुरा राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून कोविडवरील उपचार निःशुल्क करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Web Title: Treatment of covid should be done free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.