वृक्ष दत्तक योजना चळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:16 AM2018-08-19T00:16:27+5:302018-08-19T00:16:59+5:30

वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी वृक्षरोपण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी ही योजना चळवळ म्हणून अंमलात आणावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Tree adoption scheme should be organized | वृक्ष दत्तक योजना चळवळ व्हावी

वृक्ष दत्तक योजना चळवळ व्हावी

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : योजनेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी वृक्षरोपण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी ही योजना चळवळ म्हणून अंमलात आणावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर बचाव संघर्ष समिती व भारती हॉस्पिटलतर्फे वृक्ष दत्तक योजनेचा बुधवारी वनेमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे, लक्ष्मीबाई मुंधडा उपस्थित होते.
यावेळी बोलताना वनेमंत्री मुनगंटीवार म्हणाले, १ जुलै ३० सप्टेंबर या कालावधीत शासनातर्फे ज्या शेतकऱ्यांचा घरी मुलींचा जन्म होणार त्यांना पेरू, आंबा, फणस, सीताफळ, जांभुळ या जातीच्या वृक्षाचे तसेच पाच सागाचे रोपटे देण्यात येणार आहे. फळांची झाडे पाच वर्र्षांची झाल्यानंतर शेतकरी त्यांची फळे विकून मुलीचा पुस्तकांचा एक हजार ते दोन हजार रूपयांचा खर्च भागवू शकतात. तर १७ ते १८ वर्षांनी सागाचे झाड विकून त्याच्या उत्पन्नातून मुलीचा लग्नाचा खर्च करु शकतात. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वृक्ष दत्तक योजनेची माहिती देताना डॉ. ऋतृजा मुंधडा म्हणाल्या की, भारती हॉस्पिटलमध्ये प्रत्येक प्रसुतीनंतर होणाऱ्या बाळाच्या आईला एक झाडाचे रोपटे भेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, स्वागत मधुसूदन रूंगठा, संचालन डॉ. सुशिल मुंधडा तर आभार डॉ. मनीष मुंधडा यांनी मानले. यावेळी स्वप्निल राजुरकर, अ‍ॅड. आशिष मुंधडा, सुबोध कासुलकर, दिनेश जुमडे, कपिश उसगावकर, अश्विनी खोब्रागडे, मधुसूदन भूमकर, विपीन राऊत, महाजन आदी उपस्थित होते.

Web Title: Tree adoption scheme should be organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.