२५ वर्षांपासून कब्रस्तानात वृक्षसंवर्धन
By admin | Published: July 9, 2016 01:17 AM2016-07-09T01:17:08+5:302016-07-09T01:17:08+5:30
कब्रस्तान म्हटले की, आधी मुस्लीम व इस्लामची छबी पुढे येते. पण ब्रह्मपुरीच्या कब्रस्तानात एक हिंदू महिलेच्या पुढाकारातून ..
ब्रह्मपुरी : कब्रस्तान म्हटले की, आधी मुस्लीम व इस्लामची छबी पुढे येते. पण ब्रह्मपुरीच्या कब्रस्तानात एक हिंदू महिलेच्या पुढाकारातून गेल्या २५ वर्षांपासून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची परंपरणा जोपासली जात आहे. गांधीनगरजवळील कब्रस्तानात प्रा. मंजुषा बजाज यांच्या सेवाभावी पुढाकाराने विविध वृक्षांचे रोपण व संगोपणाचे कौतुक केले जात आहे. गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय परिसर, वखार महामंडळ परिसर, बस स्टॅन्ड समोरील दुतर्फा, हुतात्मा स्मारक रोड अशा अनेक ठिकाणी गेल्या २४ वर्षांपासूनची काही झाडे डौलानी उभी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कब्रस्तान येथे विविध जातींचे वृक्षरोपण करुन त्यांना जगविण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात असल्याने कब्रस्तान परिसर पुढील काही वर्षात हिरवेगार करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. शासनाने जरी आता पाऊल उचलले तरी पूर्वीपासून तळमळ प्रा. बजाज यांना तळमळ आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात इनायत खाँ पठाण, सरफरोश खाँ पठाण, गुलाब अली सयैद, प्रा. बाळ गजभिये, नारायण बोकडे, प्रा. सुभाष बजाज यांची उपस्थिती अग्रक्रमाने होती. (तालुका प्रतिनिधी)