जिल्ह्यात वृक्षारोपणाला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:11+5:302021-07-10T04:20:11+5:30
गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे असून, यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर-चंद्रपूर ...
गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे असून, यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर-चंद्रपूर रोडवर रात्रीच्या वेळी रस्त्यावरच म्हशी बसून राहतात. एखाद्या वेळी वाहन चालकाचे दुर्लक्ष झाल्यास अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, उर्जानगरकडे जाणाऱ्या पुलावरही मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे बसून राहत असल्याने, विशेषत: ट्रकचालकांना मोठ्या शिताफीने ट्रक चालवावा लागत आहे.
ग्रंथालय सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे प्रशासनाने निर्बंध घातले आहे. यामध्ये ग्रंथालये बंद करण्यात आली. प्रशासनाने शिथिलता देताच, बाजार, तसेच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रंथालये अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून ग्रंथालय सुरू करण्याची मागणी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील शहरी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेकडे वळले आहे. सध्या एमपीएसीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक अभ्यासाला लागले आहे. मात्र, घरी बसून अभ्यास होत नसल्यामुळे ग्रंथालये सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.