मिशनमोड स्वरूपात वृक्षलागवड करावी

By admin | Published: May 10, 2017 12:43 AM2017-05-10T00:43:02+5:302017-05-10T00:43:02+5:30

राज्यात १ ते ७ जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून ....

The tree should be planted in the form of mission mode | मिशनमोड स्वरूपात वृक्षलागवड करावी

मिशनमोड स्वरूपात वृक्षलागवड करावी

Next

सुधीर मुनगंटीवार : विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात १ ते ७ जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून सर्व शासकीय यंत्रणेने हे काम मिशनमोड स्वरूपात हाती घ्यावे. तसेच कामाचे नियोजन व आतापर्यंत केलेले काम वन विभागाने दिलेल्या नमून्यात संकेतस्थळावर अपलोड करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
वनमंत्री मुनगंटीवार यांनी पुणे, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या वृक्ष लागवडी संदर्भात व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
वसुंधरेचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात १ ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड होणार आहे यामध्ये वन विभागामार्फत २.२५ कोटी, इतर शासकीय विभागांकडून ७५ लाख आणि ग्रामपंचायतींकडून १ कोटी वृक्ष लागवड होणार आहे. वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष जगवण्यावर ही भर दिला जावा, असे सांगून ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत, आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही निधी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी बिहार पॅटर्नचा अवलंब करावा, असेही ते म्हणाले. अनेक बँकांकडून ट्री गार्ड खरेदी करण्यासाठी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून पैसे मिळू शकतात, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शासकीय यंत्रणेबरोबरच वृक्ष लागवडीच्या कामात व्यापक लोकसहभाग मिळवावा, यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती केली जावी, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, यामध्ये शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक- अध्यात्मिक संस्था, स्वंयसेवी संस्था, स्काऊट-गाईड, रोटरी, यांचेदेखील सहकार्य घेण्यात यावे.

वृक्ष लागवडीत व्यक्ती-संस्थांना बक्षीस देणार- सुधीर मुनगंटीवार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वृक्षलागवडीची मनामनात ज्योत पेटवताना या सर्वांसोबत शासकीय यंत्रणेने एक वृक्ष सहकार निर्माण करावा. यासाठी गावागावात वातावरण निर्मिती केली जावी. वृक्ष लागवडीची घोषवाक्ये, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित व्हावी,गावात वृक्ष दिंडी काढली जावी. वृक्ष लागवडीच्या कामात सर्व पक्षीय लोकांचा सहभाग घेण्यात यावा. चांगले काम करणाऱ्या व्यक्ती संस्थांची नावे विभागाकडे कळविण्यात यावीत. त्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र विभागाकडून दिले जाईल, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
वन विभाग हा या कार्यक्रमात सर्वांसाठी समन्वयक आहे. या विभागाने सर्वांना सोबत घेऊन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करावा. प्रत्येक जिल्ह्यात या कामासाठी एका नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. नियुक्त केलेल्या समन्वयकांची माहिती देणारी पुस्तिका प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्ध केली जावी. वृक्ष लागवडीच्या जागांची निश्चिती व्हावी, जिथे वृक्ष लावायचे तिथले खड्डे हे योग्य आकाराचे असावेत असे सांगतांना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी छोटछोट्या गोष्टींची काळजी घेतली जावी असेही ते म्हणाले.
राज्यात होणा?्या वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करावे अशा सूचना वनसचिव विकास खारगे यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले की प्रत्येक विभागात वनमंत्री पालकमंत्र्यांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन वृक्षलागवडीसंदर्भात बैठका घेणार आहेत. त्यापूर्वी ज्या ठिकाणी वृक्ष लावायचे त्या जागांची निश्चिती होणे, समन्वयकांची पुस्तिका प्रकाशित होणे, खड्डे खोदण्याचे काम पूर्ण होणे आणि यासंदर्भात केलेले नियोजन पूर्णत्वाला जाणे आवश्यक आहे. याकामात लोकांना सहभागी करून घेतांना जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या चार पत्रकार परिषदा घ्याव्यात, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन वृक्ष लागवडीपूर्वीच्या छोट्या-मोठ्या घटनांची माहिती बातमी, लेख स्वरूपात दिली जावी आणि महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी या क्षेत्रात प्रेरणादायी काम करून दाखवावे, असेही ते म्हणाले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकारी रोहयो यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
गतवर्षी लावलेल्या रोपांमधील जगलेल्या रोपांमध्ये वन विभागांच्या रोपांची टक्केवारी ही ८० टक्क््यांहून अधिक असल्याची माहिती या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे देण्यात आली. यावर्षीच्या ४ कोटी वृक्ष लागवडीचे काम अंतिम टप्प्यात असून रोपवाटिकांमधून दर्जदार रोपे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: The tree should be planted in the form of mission mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.