आदिवासी बांधवांचा विकासासाठी कटिबद्ध -देवराव भोंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:44+5:302021-03-28T04:26:44+5:30
आवाळपूर : आदिवासी समाज हा मागासवर्गीय समाज आहे. समाजातील विकासात्मक परीक्षण केल्यास काही कमी असल्याचा उणिवा आहेत. मात्र, जिल्हा ...
आवाळपूर : आदिवासी समाज हा मागासवर्गीय समाज आहे. समाजातील विकासात्मक परीक्षण केल्यास काही कमी असल्याचा उणिवा आहेत. मात्र, जिल्हा परिषद निधीअंतर्गत वेळोवेळी समाजातील विविध घटकांचा विकासासाठी निधी मजूर करून विकासकामेसुद्धा झाली आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
नांदा गट ग्रामपंचातअंतर्गत येत असलेल्या राजूरगुडा येथील हनुमान मंदिर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नांदा फाटा येथे वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये सिमेंट रस्ता, संत नगाजी महाराज देवस्थानाला जोडणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व राजूरगुडा येथील हनुमान मंदिराचे सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. जिल्हा परिषद, चंद्रपूर जिल्हा निधीअंतर्गत नऊ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी नांदा बाखर्डी क्षेत्राचे जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, माजी सरपंच घागरू कोटनाके, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, पुरुषोत्तम निब्रड, अभय मुणोत, रत्नाकर चटप, शारदा मंडाळी, प्रिया राजगडकर आदींची उपस्थिती होती.