आदिवासी बांधव खावटी अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:29 AM2021-01-25T04:29:28+5:302021-01-25T04:29:28+5:30
कोराेना काळात आदिवासी जनतेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना अशा हलाकीच्या परिस्थितीवर मात करून त्या लोकांचे आर्थिक स्थैर्य उंचवावे ...
कोराेना काळात आदिवासी जनतेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना अशा हलाकीच्या परिस्थितीवर मात करून त्या लोकांचे आर्थिक स्थैर्य उंचवावे ह्या उदात्त हेतूने शासनाने रोजगार हमी योजनेचे मजूर, विधवा महिला, दिव्यांग, भूमिहीन शेतमजूर इत्यादी दुर्बल घटकातील लोकांना जीवनावश्यक वस्तू व दोन हजार रुपये रोख रक्कम देण्याचे आदेश पारित करुन ही अनुदानित योजना आदिवासी प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार गरजू आदिवासी नागरिकांचे अर्ज आश्रमशाळेतील शिक्षकाकडून मागविण्यात आले. परंतु माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, अजूनपर्यंत आदिवासी जनतेला त्याचा लाभ मिळाला नसल्याने आदिवासी जनता खावटी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने या बाबींकडे लक्ष देऊन खावटी अनुदानाचा लाभ त्वरित देण्यात यावा, अशी मागणी आहे.