जोेडनघाट पहाडावर आदिवासी संस्कृती संग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:57 PM2018-01-21T23:57:43+5:302018-01-22T00:01:46+5:30
आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे.
आॅनलाईन लोकमत
राजुरा : आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे, त्यांच्या रुढी, परंपरा जगापुढे यावे, याकरिता तेलंगणा राज्यातील आसिफाबादवरून ४० किलोमीटर अंतरावरील निसर्गाने नटलेल्या जोडनघाट पहाडावर आदिवासी संस्कृती संग्रहालय उभारले आहे. शुरवीर कुमराम भीमू यांच्या समाधी स्थळाजवळ निर्माण करण्यात आलेली ही वास्तू आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी ठरत आहे.
या संग्रहालयामध्ये आदिवासी समाजाच्या रुढी-परंपरा, चालीरिती, सांस्कृतीक महोत्सवाची हुबेहुब निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर निजामाच्या विरोधात लढणाºया शुरवीर कुमराम भीमू यांच्या समाधी स्थळावर एक नवीन ऊर्जा प्राप्त झाल्याचा आभास होत असते. त्यामुळे हे ठिकाणी तेलंगणा सोबतच महाराष्टÑातील आदिवासी नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या कामासाठी २० कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
जोडनघाट येथे राजुराचे माजी आ. प्रभाकर मामुलकर, जिल्हा परिषद सदस्य गोदरु पा. जुमनाके, आदिवासी नेती भीमराव मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप नलगे, विश्वेवर मंगाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष बाबूराव मडावी, भारीचे सरपंच सत्तरशाहा कोटनाके, माजी जि. प. अध्यक्ष संतोष कुमरे, सरपंच सोनेराव पेंदोरे, सरपंच प्रभाकर उईके, सरपंच हनमंतु कुमरे, सरपंच सिताराम मडावी, सरपंच रामनराव तोडासे, माजी सरपंच भास्कर सिडाम, नामदेव मडावी, पांडुरंग कोले, गोविंद पंधरे, भीमराव मेश्राम, प्राचार्य सुगणाकर यांच्यासह आदिवासी समाजबांधवांनी भेट दिली.
जिवती तालुक्यात संग्रहालय उभारा
ज्याप्रमाणे तेलंगणा सरकारने आदिवासी संस्कृती जपण्यासाठी जोडनघाट येथे मोठी वास्तू निर्माण केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने जिवती तालुक्यातील पहाडी भागात आदिवासीची संस्कृती जपणारी वास्तू निर्माण करावी, अशी मागणी माजी आ. प्रभाकर मामुलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.