संविधानाचा सन्मान राखला तरच आदिवासींचा विकास- चंद्रभान पराते
By Admin | Published: January 24, 2015 12:33 AM2015-01-24T00:33:46+5:302015-01-24T00:33:46+5:30
संविधानाचा सन्मान राखला तरच आदिवासींचा विकास शक्य होईल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी केले.
चंद्रपूर: संविधानाचा सन्मान राखला तरच आदिवासींचा विकास शक्य होईल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी केले.
आदिवासी माना समाजाच्यावतीने स्थानिक मॉ माणिकादेवी मंदिर परिसरात आयोजित समाजाच्या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. समाजसेवक आडकु नन्नावरे तर प्रमुख अतिथी म्हणून माना समाजाचे अध्यक्ष दामोधर केदार उपस्थित होते.
पराते पुढे म्हणाले, संविधानाच्या यादीमध्ये ज्या-ज्या जमातींचा समावेश आहे. त्यांपैकी काही जमातींना ३० ते ४० वर्षापासून असली-नकलीच्या वादात अडकवून ठेवण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचा इतिहास आहे. या आदिवासींचा विकास निधी विदर्भातून पळवून नेण्यात आला. आदिवासींच्या नावावर केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारा निधी आदिवासींवर खर्च होत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास होण्यास अडचण झाली.
ज्येष्ठ समाजसेवक आडकुजी नन्नावरे यांनी समाजाने राजकीय शक्ती उभी करावी तर माना आदिवासी समाजाचे अध्यक्ष दामोधर केदार यांनी एका झेंड्याखाली एकत्र येवून माना समाजाची शक्ती उभी दिसली पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यााठी विठ्ठल ढोक, प्रभाकर गुडधे, नथ्यू झाडे, देवराव सोनावणे, सुभाष नन्नावरे, कल्पना घरत, रेखा ढोक, उमा दोडके, लक्ष्मीबाई गजभे यांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)